scorecardresearch

Premium

अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी खुशखबर; ओटीटीवर नव्हे तर मोठ्या पडद्यावर येणार ‘ओह माय गॉड २’

या चित्रपटात अक्षय कुमारसह पंकज त्रिपाठी हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत

ohmygod2
फोटो : इंडियन एक्सप्रेस

यावर्षी अक्षय कुमारचा ‘सेल्फी’ हा एकच चित्रपट प्रदर्शित झाला आणि तो बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. एकंदरच अक्षय कुमारचे आत्तापर्यंतचे फ्लॉप चित्रपटांची यादी पाहता त्याचा पुढचा चित्रपट ‘ओह माय गॉड २’ चित्रपटगृहांऐवजी OTT वर प्रदर्शित होऊ शकतो अशी बातमी समोर आली. आता मात्र या चित्रपटाबद्दल एक नवीन अपडेट समोर आला आहे.

पिंकव्हीलाच्या रीपोर्टनुसार अक्षय कुमारचा ‘ओह माय गॉड २’ हा चित्रपट चित्रपटगृहातच प्रदर्शित होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. यासंदर्भात अक्षय कुमार आणि निर्माते अश्विन वरदे आणि जिओ स्टुडिओज यांच्यात बरीच चर्चा झाली. या चर्चेतून हा चित्रपट मोठ्या पडद्यावरच प्रदर्शित करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

आणखी वाचा : “याने पुन्हा इडल्या विकाव्यात…” पहिल्या चित्रपटानंतर सुनील शेट्टीची प्रसिद्ध समीक्षकाने उडवलेली खिल्ली

या चित्रपटाचं काम पूर्ण झालं असून लवकरच याच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली जाणार आहे. अक्षयच्या ३० वर्षांच्या करकीर्दीतील हा अत्यंत खास चित्रपट असणार आहे असं खुद्द अक्षयनेही कबूल केलं आहे. त्यामुळे अक्षयसह निर्मात्यांनादेखील या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.

या चित्रपटात अक्षय कुमारसह पंकज त्रिपाठी हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याचं दिग्दर्शन अमित राय यांनी केलं आहे. याबरोबरच याचवर्षी अक्षयचा ‘द ग्रेट इंडियन रेस्क्यू’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. यात अक्षय कुयारबरोबर परिणीती चोप्राही झळकणार आहे, पण ‘ओह माय गॉड २’ या मोठ्या पडद्यावर येणार असल्याची बातमी ऐकल्यामुळे बरेच चाहते खुश झाले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Akshay kumar and pankaj tripathi starrer oh my god 2 will be released in theatres only avn

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×