Bhooth Bangla trailer: ‘भूत बंगला’ या सिनेमाची गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. अक्षय कुमारच्या या सिनेमाचा ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचा जॉनर हॉरर कॉमेडी असा आहे.

ट्रेलरमध्ये एक मोठा बंगला पाहायला मिळतो, जो खूप जुना असल्याचे दिसते. तसेच ऐकायला मिळते की वधूसुर कुठेही गेला नाही, तो आणखी शक्तिशाली झाला आहे. याचा अर्थ आहे की त्याला पुन्हा कोणीतरी जिवंत करण्याचा प्रयत्न करत आहे, यातून वाचून बाहेर पडणे कठीण आहे. याचदरम्यान बंगल्यात तसेच त्याच्या परिसरात घडणाऱ्या चित्र-विचित्र, भयानक गोष्टी दिसतात. एक व्यक्ती बंगल्यात प्रवेश करत असल्याचे पाहायला मिळते.

अक्षय कुमारच्या ‘भूत बंगला’ सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

ट्रेलरमध्ये अक्षयचे पात्र पाहायला मिळते, त्याला एक बंगला वारशाने मिळतो, ज्याच्या मागे पिशाच वन नावाचे जंगल आहे. तिथे भूताचा वावर असल्याचे सांगितले जाते. त्याने ते घर सोडून जावे म्हणून त्याला विविध गोष्टींमधून इशारे मिळतात, पण तो बंगला सोडून जाण्यास नकार देतो. तो म्हणतो, “इतका मोठा महाल सोडून जायला मी काही वेडा नाही.”

Award Banner

पुढे वामिका गब्बीचे पात्र पाहायला मिळते. ती म्हणते की, इथे किती छान गोष्टी आहेत. देऊळ, भूत यांच्या गोष्टी कुतूहल निर्माण करतात.

ट्रेलरमध्ये पुढे असरानी, राजपाल यादव, परेश रावल यांची पात्रे पाहायला मिळतात. काही वेळा थरारक दृश्ये दिसतात, तर काही वेळा त्यांचे डायलॉग खळखळून हसवतात. मिथिला पालकर, तब्बू यांची पात्रेही दिसतात. अक्षय तिथे लग्न करण्याचे ठरवतो. तिथे लग्न केले जाऊ शकत नाही, नाहीतर वधूसुर येईल असे त्याला सांगण्यात येते. तसेच इथे भूतांशिवाय कोणीही थांबत नाही असेही सांगितले जाते.

या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले आहे. अक्षय कुमार व प्रियदर्शन जवळजवळ १६ वर्षांनी एकत्र काम करत आहेत.

भूत बंगलाच्या ट्रेलरला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. एकाने हा ट्रेलर पाहिल्यानंतर आठवणी जाग्या झाल्या आहेत असे लिहिले आहे, तर काहींनी आधीच्या चित्रपटांचे मिश्रण वाटत असल्याचे लिहिले आहे. अक्षय कुमार व प्रियदर्शन यांच्या आधीच्या चित्रपटातील ‘हेरा फेरी’ आणि ‘भूल भुलैय्या’ या सिनेमातील ज्या पद्धतीचे विनोद होते, तसेच विनोद असल्याचे काहींनी लिहिले आहे. अनेकांनी चित्रपटातील विनोदाचे कौतुक केले आहे.

दरम्यान, १६ एप्रिल २०२६ ला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.