Selfiee Weekend Box Office collection : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार व इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत असलेला ‘सेल्फी’ हा चित्रपट २४ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. कॉमेडी ड्रामा असलेल्या अक्षय कुमारच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. २०२३ या नववर्षातील खिलाडी कुमारचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे प्रेक्षकांनाही अक्षयच्या या चित्रपटाकडून अपेक्षा होत्या. पण हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षेस खरा उतरला नसल्याचं चित्र आहे.

या चित्रपटाला प्रदर्शनाच्या दिवशी काही खास कामगिरी करता आलेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, ‘सेल्फी’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवशी बॉक्स ऑफिसवर केवळ २.६० कोटींची कमाई केली. त्यामुळे ‘सेल्फी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरल्याचं निश्चित झालं आहे, इतकंच नव्हे तर पहिल्या विकेंडलासुद्धा या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन फारसं नसल्याने अक्षय कुमारच्या सर्वात कमाई करणाऱ्या चित्रपटात ‘सेल्फी’चा नंबर पहिले लागणार आहे.

rajkaran gela Mishit marathi movie on April 19 in theaters
‘राजकारण गेलं मिशीत’ १९ एप्रिलला चित्रपटगृहात
Manjummel Boys movie to release OTT
अवघ्या २० कोटींचं बजेट अन् कमावले २२५ कोटी, एकही अभिनेत्री नसलेला ‘हा’ सिनेमा ओटीटीवर होणार प्रदर्शित
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
Crew box office collection day 1
‘क्रू’ चित्रपटाची दमदार सुरुवात, करीना-तब्बू-क्रितीची जुगलबंदी प्रेक्षकांना भावली, पहिल्या दिवशी केली जबरदस्त कमाई

आणखी वाचा : शाहरुख खानच्या होस्टिंगबद्दल अरबाज खानचं मोठं वक्तव्य; भाऊ सलमान आणि बिग बींबरोबर केली तुलना

रविवारी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३.८५ कोटीची कमाई केली तर शनिवारीदेखील ३ कोटीच्या आसपासच कमाई केली होती. या पूर्ण वीकेंडचं कलेक्शन बघायला गेलं तर अक्षय कुमारच्या या चित्रपटाने ३ दिवसांत केवळ १०.२० कोटी एवढीच कमाई केली आहे. गेल्या काही वर्षातला अक्षय कुमारचा पहिल्या विकेंडला सर्वात कमी कमाई करणारा म्हणून या चित्रपटाकडे पहिलं जात आहे.

अक्षय कुमार सातत्याने चर्चेत येत असतो. सेल्फी चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्याने एका मुलाखतीत फ्लॉप चित्रपटांची जबाबदारी स्वतःवर घेतली आहे. आजतकला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “माझ्याबरोबर हे काही पहिल्यांदा घडलेले नाही. एक काळ असा होता की माझे सलग १६ चित्रपट फ्लॉप ठरले. चित्रपट चालत नाही ही माझीच चूक आहे आणि ते मी मान्य करतो, प्रेक्षक बदलतो त्याप्रमाणे आपणही बदलायला हवं.”