Video : चित्रपटांना अपयश मिळत असताना अक्षय कुमारचा महत्त्वपूर्ण निर्णय, स्वतःचा फॅशन ब्रॅण्ड केला लाँच | akshay kumar launch his new fashion brand share video on instagram see details | Loksatta

Video : चित्रपटांना अपयश मिळत असताना अक्षय कुमारचा महत्त्वपूर्ण निर्णय, स्वतःचा फॅशन ब्रॅण्ड केला लाँच

अक्षय कुमारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याने एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.

Video : चित्रपटांना अपयश मिळत असताना अक्षय कुमारचा महत्त्वपूर्ण निर्णय, स्वतःचा फॅशन ब्रॅण्ड केला लाँच
अक्षय कुमारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याने एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.

अभिनेता अक्षय कुमारचे गेल्या काही एक ते दोन वर्षांमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. अगदी अलिकडे प्रदर्शित झालेल्या ‘रामसेतू’ चित्रपटही बॉक्स ऑफिसवर पुरता आपटला. दरम्यान चित्रपटांमध्ये अपयश मिळत असताना अक्षयने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अक्षयने त्याचा एक फॅशन ब्रण्ड लाँच केला आहे.

आणखी वाचा – Inside Photos : ऐसपैस गार्डन, प्रवेशद्वाराजवळ गणेशमुर्ती, आलिशान हॉल अन्…; अक्षय कुमारने दाखवली घराची झलक

अक्षयने पहिल्यांदाच त्याच्या घराचा खास व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला. दरम्यान त्याने त्याचं घर व वॉर्डरोब दाखवलं. शिवाय त्याच्या कपड्यांचंही कलेक्शन या व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं.

अक्षयने व्हिडीओ शेअर करत फॅशन ब्रँड लाँच करत असल्याचं त्याने सांगितलं. ‘फोर्स नाईन’ (Force IX) असं अक्षयच्या नव्या फॅशन ब्रण्डचं नाव आहे. तरुणाईला आवडतील अशाच कपड्यांच्या डिझाइन अक्षयला बनवायच्या आहेत.

आणखी वाचा – Video : मतभेद, मैत्री, काही वर्ष अफेअर, आठ वर्षांचा संसार अन्…; स्पृहा जोशीच्या नवऱ्याला पहिलंत का? पहिल्यांदाच शेअर केला मजेशीर व्हिडीओ

अक्षयच्या टीममध्ये सगळी तरुण मंडळी असल्याचंही त्याने सांगितलं. शिवाय नऊ नंबर त्याचा लकी आहे. नऊ तारखेलाच त्याचा वाढदिवस असतो. म्हणूनच अक्षयने या फॅशन ब्रण्डचं नाव ठेवत असताना नऊ नंबरचा यामध्ये समावेश केला. भारतातच या फॅशन ब्रण्डचं काम होणार असल्याचं अक्षयने सांगितलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 20:02 IST
Next Story
Himachal Pradesh Election Results 2022: भाजपाकडून निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये आहेत सलमान खानचे….