Akshay Kumar pranks Saif Ali Khan’s son Taimur: अक्षय कुमार हा बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. तो त्याच्या विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. नुकताच तो वेलकम टू द जंगल या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. वेलकम टू द जंगल सिनेमाने जगभरात १९४.१८ कोटींची कमाई केली आहे.
आता अक्षय कुमार लवकरच आणखी एका सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या या आगामी सिनेमाची चर्चा होत आहे. कारण तो सैफ अली खानबरोबर जवळजवळ १७ वर्षांनी एकत्र दिसणार आहे. ते एका अॅक्शन थ्रिलर या सिनेमात दिसणार आहेत.
अक्षय कुमार व तैमुरचा व्हिडीओ होतोय व्हायरल
‘हैवान’ असे या सिनेमाचे नाव आहे. त्यांना एकत्र पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आता हा सिनेमा रिलीज होण्यापूर्णी हे दोन्ही कलाकार लंडनमध्ये एकत्र दिसले. त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा तैमूरदेखील होता. सैफ अली खान, अक्षय कुमार व तैमूर यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
लॉर्ड्सवर झालेल्या भारत व इंग्लंडदरम्यानच्या सामन्याला हे कलाकार उपस्थित होते. त्या वेळचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, अक्षय तैमूरवर प्रँक करतो. तो, तैमूर आणि सैफ रस्त्यावरून चालत असल्याचे दिसते. त्यावेळी अक्षय अचानक तोल गेल्याचे नाटक करतो आणि लगेच स्वत:ला सांभाळतो, त्यानंतर हसू लागतो. ते पाहून तैमूरही हसत असल्याचे दिसते. तसेच, सैफ अली खान आणि त्यांच्याबरोबर असलेले सर्व जण हसत असल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
या सगळ्याबरोबरच सैफ अली खान व अक्षय कुमारच्या लूकनेही लक्ष वेधून घेतले. या कलाकारांबरोबरच क्रिती सेनॉन, तिचा कथित बॉयफ्रेंड कबीर बाहिया हे कलाकार भारत व इंग्लंडदरम्यानचा क्रिकेट सामना पाहायला पोहोचले होते.
सैफ अली खान व अक्षय कुमार यांच्याबद्दल बोलायचे तर त्यांनी याआधीही एकत्र काम केले आहे. हैवान हा त्यांचा सातवा एकत्रित सिनेमा आहे. या दोघांनी यापूर्वी ये दिल्लगी, मैं खिलाडी तू अनाडी, तू चोर मैं सिपाही, कीमत : दे आर बॅक, आरजू व टशन अशा सिनेमांत एकत्र काम केले आहे. त्यांचे चित्रपट लोकप्रिय ठरले आहेत.
सैफ अली खानने ‘व्हरायटी इंडिया’ला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत त्याने अक्षय कुमारला या नवीन भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले. तसेच, त्याला याआधी कधीही अशा भूमिकेत पाहिले नसल्याचे वक्तव्यही त्याने केले. तसेच, तो असेही म्हणाला की, अक्षय कुमारवर माझे प्रेम आहे. तो मला माझ्या मोठ्या भावासारखा आहे. आम्ही यााआधीही एकत्र काम केले आहे.
दरम्यान, हैवान हा सिनेमा ११ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. आता १७ वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
