scorecardresearch

Premium

अक्षय कुमारच्या सुपरफ्लॉप चित्रपटांच्या यादीमध्ये ‘राम सेतु’चा समावेश? १०० कोटी रुपयांचा टप्पा गाठणंही कठीण

अक्षय कुमारच्या ‘राम सेतु’ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत एक नवी माहिती समोर आली आहे.

ram setu box office collection box office
अक्षय कुमारच्या ‘राम सेतु’ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत एक नवी माहिती समोर आली आहे.

अक्षय कुमारचा ‘राम सेतु’, अजय देवगणचा ‘थँक गॉड’ तर सुबोध भावेचा ‘हर हर महादेव’ चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले. अक्षयच्या ‘राम सेतु’ने बॉक्स ऑफिसवर प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी उत्तम कामगिरी केली. पण त्यानंतर या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. ‘राम सेतु’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी १५ कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली. त्यानंतर या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचा आकडा घसरतच गेला. आता पुन्हा एकदा चित्रपटाच्या कमाईमध्ये सुधारणा झाली असल्याचं समोर आलं आहे.

आणखी वाचा – अक्षय कुमारच्या ‘राम सेतु’कडे प्रेक्षकांची पाठ, चित्रपटासाठी कोट्यवधींचा खर्च करूनही हाती निराशा

askshay kumar shahrukh khan salman khan
यशाची नवी समीकरणे!
the vaccine war
विवेक अग्निहोत्रींच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’ला सर्वत्र थंड प्रतिसाद, प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचण्यासाठी निर्मात्यांनी दिली ‘ही’ लहास ऑफर
vaccine war
“अशा प्रकारच्या कथेची…”, ‘द व्हॅक्सिन वॉर’चा ट्रेलर पाहून प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रियांनी वेधलं लक्ष, म्हणाले…
oppenheimer-ott-release
नेटफ्लिक्स की अ‍ॅमेझॉन प्राइम; कधी व कशावर पाहता येणार ख्रिस्तोफर नोलनचा ‘ओपनहायमर’?

प्रदर्शनापूर्वीच अक्षयचा हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे ‘राम सेतु’ला प्रेक्षकांचा कितपत प्रतिसाद मिळणार याबाबत प्रश्नचिन्ह होतं. ‘राम सेतु’ने प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी ११ कोटी ४० लाख रुपये तर तिसऱ्या दिवशी ८ कोटी ७५ लाख रुपये कमाई केली. शुक्रवारी चित्रपटाने ६ कोटी रुपयांचा गल्ला जमावला. आता या आकडेवारीमध्ये थोडीफार सुधारणा झाली आहे.

प्रसिद्ध चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी केलेल्या ट्विटनुसार या चित्रपटाने प्रदर्शनाच्या ५व्या दिवशी ७ कोटी ३० लाख रुपये कमाई केली आहे. म्हणजेच आतापर्यंत ‘राम सेतु’ने ४८ लाख ७५ कोटी रुपये कमावले आहेत.

१५० कोटी रुपयांचा बजेट असणारा हा चित्रबपट अजूनही ५० कोटी रुपयांचा आकडा पार करू शकला नाही. ‘बच्चन पांडे’, ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘रक्षाबंधन’ सुपरफ्लॉप ठरल्यानंतर ‘राम सेतु’कडून प्रेक्षकांना अपेक्षा होत्या. मात्र चित्रपटाच्या कमाईमध्ये अशीच घसरण होत राहिली तर ‘राम सेतु’ १०० कोटीपर्यंत तरी पोहोचणार का? अशी शंका निर्माण होत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Akshay kumar ram setu movie day 5th box office collection weekend holiday impact on film see details kmd

First published on: 30-10-2022 at 19:44 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×