बॉलीवूडचा खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अक्षय कुमार सध्या चांगलाच चर्चेत आहे. लवकरच तो ‘वेलकम ३’ आणि ‘हेरा फेरी ३’ या चित्रपटांमधून प्रेक्षकाच्या भेटीला येणार आहे. अक्षय हा चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. मात्र, गेल्या काही काळापासून त्याचे चित्रपट पूर्वीसारखी कमाई करताना दिसत नाहीयेत. त्यामुळेच अक्षयने त्याच्या फीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा- अभिनेता गोविंदाची चौकशी होणार, तब्बल १००० कोटींच्या ऑनलाइन घोटाळ्याचं आहे प्रकरण, अधिकारी माहिती देत म्हणाले…

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

अक्षय कुमारच्या ‘ओमजी २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती पण त्याचवेळी सनी देओलचा ‘गदर २’ सोबत प्रदर्शित झाल्यामुळे त्याचा फटका अक्षयच्या चित्रपटला बसला. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार सततच्या फ्लॉप चित्रपटांमुळे अक्षयने आपल्या फीमध्ये घट करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. पण अक्षयने चित्रपट निर्मात्यांसमोर एक अट ठेवली असल्याची माहिती मिळाली आहे. चित्रपटाच्या प्रॉफिटमध्ये अक्षय हिस्सा घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सुरुवातीला हेराफेरी ३ मध्ये अक्षयच्या ऐवजी कार्तिक आर्यन मुख्य़ भूमिका साकारणार असल्याची माहिती मिळाली होती. चित्रपट निर्माते नाडियाडवाला यांच्याबरोबर अक्षयचे मतभेद असल्याचे सांगण्यात येत होतं. मात्र आता अक्षयने हे मतभेद दूर केले असून त्यांच्याबरोबर ‘प्रॉफिट शेयरिंग डील’वर सही केली आहे.

हेही वाचा-

चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, ‘वेलकम ३’ आणि ‘हेरा फेरी ३’ व्यतिरिक्त, अक्षयकडे बडे मियाँ छोटे मियाँ, मिशन रानीगंज सारखे अनेक मोठे चित्रपट आहेत. याशिवाय महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीक दौडले सात’ या चित्रपटातूनही तो मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटात तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.

Story img Loader