Akshay Kumar shares why he has not eaten a Samosa in the last 15 years : अक्षय कुमार नेहमी त्याच्या फिटनेसमुळे चर्चेत असतो. तो त्याच्या फिटनेसची विशेष काळजी घेतो. लवकर झोपणे, लवकर उठणे आणि चांगला आहार घेणे या गोष्टी तो नियमीतपणे करतो. अशातच आता त्याने गेल्या १५ वर्षात कधीच सामोसा खालेला नाहीये. असं म्हटलं आहे.
मनोरंजनविश्वातील अनेक कलाकार स्क्रीनवर छान दिसण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी, वजन वाढू नये यासाठी आणि खालेल्या पदार्थांचा त्वचेवर कुठला परिणाम होऊ नये म्हणून डाएट, डेली रूटीन, फिटनेस अशा गोष्टी करत असतात. यामुळे बरेच जण त्यांच्या आवडीचे पदार्थसुद्धा खाणं टाळतात. अनेकदा त्यांना डाएटमुळे विशिष्ट गोष्टीच खाव्या लागतात. अक्षय कुमारसुद्धा गेली १५ वर्षे सामोसा खात नसून यामागचं कारण त्याने आता सांगितलं आहे.
अक्षय कुमार सध्या त्याच्या ‘भूत बंगला’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच त्याचा हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या हॉरर कॉमेडी चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. चित्रपटांबरोबर अक्षय कुमार टेलिव्हिजनवरील रिअॅलिटी शो ‘व्हील ऑफ फॉर्च्यून’मध्ये सूत्रसंचालन करत आहे. याच शोमध्ये त्याने सांगितलं की गेल्या १५ वर्षांपासून तो सामोसा खात नाहीये.
अक्षय कुमार का नाही खात समोसा?
कार्यक्रमादरम्यान एका स्पर्धकाने त्याला सरळ विचारलं की सर गेल्या १५ वर्षांत तुम्ही सामोसा खालेला नाहीये हे खरं आहे का? यावर अभिनेता म्हणाला, “मग त्यात काय चुकीचं आहे?” यानंतर जेव्हा स्पर्धकाने त्याला इतका स्वादिष्ट पदार्थ तुम्ही कसा खाणं टाळू शकता असं विचारल्यानंतर अक्षय कुमारने यामागचं खरं कारण सांगितलं.
अक्षय कुमार सामोसा न खाण्यामागचं कारण सांगत म्हणाला, “मी डाएट किंवा वजन वाढेल यामुळे सामोसा खाणं सोडलेलं नाहीये. तर समोसा खालल्यानंतर मला अॅसिडीटी होते. म्हणून मी खात नाही. जेणेकरुन मला कुठला त्रास होणार नाही.” अक्षय कुमार त्याच्या आरोग्याची आणि फिटनेसची खूप काळजी घेतो आणि त्यासाठी तो संध्याकाळी ७नंतर काहीही खात नाही. तसंच पहाटे ४ वाजता उठतो. अभिनेता व्यायाम, चांगला आहार यामुळे ५९व्या वर्षी एकदम फिट आहे.
