scorecardresearch

Video : स्वतःच गाणं गात बेधूंद होऊन नाचली ट्विंकल खन्ना, अक्षय कुमार व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “तुझ्या वेडेपणाचा…”

अक्षय कुमारने ट्विंकल खन्नाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पत्नीचा मजेशीर व्हिडीओ केला शेअर

Video : स्वतःच गाणं गात बेधूंद होऊन नाचली ट्विंकल खन्ना, अक्षय कुमार व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “तुझ्या वेडेपणाचा…”
अक्षय कुमारने ट्विंकल खन्नाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पत्नीचा मजेशीर व्हिडीओ केला शेअर

कलाक्षेत्रामधीला एव्हरग्रीन कपल म्हणजे अक्षय कुमार व ट्विंकल खन्ना. दोघांची खऱ्या आयुष्यातील केमिस्ट्री पाहून चाहत्यांनाही त्यांचा हेवा वाटतो. अक्षय सोशल मीडियाद्वारे ट्विंकलबरोबरचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करताना दिसतो. दोघांचे मजा-मस्ती करतानाचेही बरेच व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. आताही ट्विंकलच्या वाढदिवसानिमित्त अक्षयने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – ‘तारक मेहता…’मधील अय्यर ४२व्या वर्षी करणार लग्न, अभिनेत्याची होणारी पत्नी मुनमुनपेक्षाही दिसते सुंदर

ट्विंकल खन्नाचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त अक्षयने ट्विंकलचा मजेशीर व्हिडीओ शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या व्हिडीओमध्ये ट्विंकल स्वतःच गाणी म्हणत नाचताना दिसत आहे. हे पाहून अक्षयने तिला सल्ला दिला आहे.

पाहा व्हिडीओ

अक्षय हा व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “तू माझा लाइव्ह परफॉर्मन्स पाहिला नाहीस याचा तुला आनंद असला तरी प्रत्येक दिवशी तुझ्या वेडेपणाचा मी साक्षीदार आहे याचा मला आनंद होतो. मी तुझ्यावर जितकं प्रेम करतो तितकंच तू गाणं थांबवावसं असं मला वाटतं. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा टीना.”

आणखी वाचा – ‘अलिबाबा’ मालिकेत तुनिषा शर्माची भूमिका कोण साकारणार? निर्मात्यांचा मोठा निर्णय, शीझानलाही दाखवला बाहेरचा रस्ता

अक्षयने शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अक्षय कुमारचे चित्रपट जेव्हा फ्लॉप होतात तेव्हा ट्विंकल खन्नाची प्रतिक्रिया अशी असते अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर काहीजण ट्विंकलचा हा व्हिडीओ एण्जॉय करत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-12-2022 at 12:14 IST

संबंधित बातम्या