scorecardresearch

“जे सहन करतोय…” ‘सेल्फी’चा दूसरा ट्रेलर शेअर करत अक्षय कुमारने केलं बॉयकॉट ट्रेंडवर भाष्य

चित्रपटात अक्षय कुमार एका सुपरस्टारची भूमिका साकारत आहे

akshay kumar selfiee teaser 2
फोटो : सोशल मीडिया

अक्षय कुमार आणि इम्रान हाश्मी यांच्या ‘सेल्फी’ या चित्रपटाची चर्चा गेल्या वर्षापासून आहे. मध्यंतरी याचं एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. हे पोस्टर प्रेक्षकांना चांगलंच पसंत पडलं होतं. त्यानंतर या ‘सेल्फी’चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. करण जोहरच्या ‘धर्मा प्रोडक्शन’ या बॅनरखाली हा चित्रपट तयार झाला आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरमधून एक बॉलिवूड सुपरस्टार आणि त्याचा एक चाहता यांच्यातील एक वेगळंच नाट्य पाहायला मिळालं. आपल्या आवडत्या स्टारबरोबर सेल्फी काढण्यासाठी आपल्या मुलाइतकाच उत्सुक असलेला चाहता केवळ एका सेल्फीसाठी नेमकं काय करतो जेणेकरून त्या सुपरस्टार आणि एका सामान्य फॅनमध्ये एकप्रकारचं वैर निर्माण होतं. यातून नेमकं काय निष्पन्न होतं आणि त्या चाहत्याला सेल्फी मिळतो की नाही यावर हा चित्रपट बेतलेला असल्याचं याच्या ट्रेलरवरून स्पष्ट झालं.

आणखी वाचा : ‘पठाण’साठी ‘व्हॅलेंटाईन डे’ ठरला लकी; छप्परफाड कमाई करत लवकरच किंग खान मोडणार ‘हा’ रेकॉर्ड

आता या चित्रपटाचा आणखी एक टीझर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात अक्षय कुमार एका सुपरस्टारची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात अक्षयच्या पात्रालाही ‘बॉयकॉट’चा सामना करावा लागला आहे. या नव्या टीझरमध्ये नेमकी हीच गोष्ट मांडण्यात आली आहे. या दुसऱ्या टीझरमध्ये ‘बॉयकॉट’ कल्चरचा चेहेरा दाखवण्यात आला आहे. खुद्द अक्षय कुमारने हा टीझर शेअर करत ‘बॉयकॉट बॉलिवूड’वर भाष्य केलं आहे.

आपल्या सोशल मीडियावर हा टीझर शेअर करत अत्यंत थोडक्यात अक्षयने त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. पोस्टमध्ये अक्षय लिहितो, “जे सहन करत आहोत, तेच दाखवायचा प्रयत्न करत आहोत, सेल्फी चित्रपट पाहायला चित्रपटगृहात नक्की या.” या नव्या टीझरमधून सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बॉयकॉट ट्रेंडबद्दल भाष्य केलं गेलं आहे. गेल्यावर्षी याच बॉयकॉट ट्रेंडचा अक्षय कुमारच्या चित्रपटांनाही फटका बसला. अक्षय आणि इम्रानचा ‘सेल्फी’ २४ फेब्रुवारीला चित्रपटगृहात झळकणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-02-2023 at 19:04 IST