Premium

Mission Raniganj Trailer: खाणीत अडकलेल्या ६५ मजूरांना वाचवणाऱ्या इंजिनियरची कहाणी; अक्षय कुमारच्या ‘मिशन राणीगंज’चा ट्रेलर प्रदर्शित

७ सप्टेंबर रोजी, निर्मात्यांनी या चित्रपटाचा एक दमदार टीझर प्रदर्शित केला होता, ज्याने या कथेबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली

mission-raniganj-trailer
फोटो : सोशल मीडिया

Mission Raniganj Trailer: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार त्याच्या आगामी मिशनगंज ‘राणीगंज: द ग्रेट भारत रेस्क्यू’ या नवीन चित्रपटामुळे काही दिवसांपासून चर्चेत आहे. अक्षयचे आधीचे बरेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त फ्लॉप ठरल्याने या चित्रपटाकडून प्रेक्षकांना जास्त अपेक्षा आहेत. हा चित्रपट माइन इंजिनियर जसवंत सिंग गिल यांच्यावर आधारित आहे. नुकताच निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

७ सप्टेंबर रोजी, निर्मात्यांनी या चित्रपटाचा एक दमदार टीझर प्रदर्शित केला होता, ज्याने या कथेबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली. आता समोर आलेल्या ट्रेलरवरून चित्रपटाच्या कथेबाबत आणखी काही गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. जसवंत सिंग गिलच्या भूमिकेत अक्षय खूपच शोभून दिसत आहे.

आणखी वाचा : नेटफ्लिक्स पाठवणार त्यांच्या खास लाल लिफाफ्यातील शेवटची डीव्हीडी; जवळ आला एका पर्वाचा अंत

खाणीत पाणी भरल्याने ६५ कामगार आत अडकल्याचे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. कामगारांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. त्यांना वाचवण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करतो. त्यानंतर अक्षय कुमार त्याची त्यांना बाहेर काढण्यासाठी एक योजना आखतो. यावरच हे पूर्ण कथानक बेतलं आहे. ट्रेलरमधून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहेच पण सत्यघटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटात एक वेगळाच थरार अनुभवायला मिळणार आहे ही नक्की.

अक्षय कुमार यात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. याबरोबरच रवी किशनही खाणीतील कामगाराच्या एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. याबरोबरच जसवंत सिंह गिल यांच्या पत्नीची म्हणजेच अक्षय कुमारच्या पत्नीची भूमिका परिणीती चोप्राने निभावली आहे. ‘मिशन राणीगंज: द ग्रेट भारत रेस्क्यू’ हा चित्रपट ६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. याआधी याचे नाव ‘कॅप्सूल गिल’ असणार होते, नंतर हे नाव बदलून ‘द ग्रेट इंडिया रेस्क्यू’ करण्यात आले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Akshay kumar upcoming mission raniganj the great bharat rescue film trailer out avn

First published on: 25-09-2023 at 16:57 IST
Next Story
Video: “हजार साल के गुलामी के पीछे…” विवेक अग्निहोत्रींच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’मध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीचा बेधडक अंदाज, म्हणाली…