Shilpa Shetty on Akshay Kumar: अक्षय कुमार नुकताच ‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांची उत्तम पसंती मिळत आहे. अभिनेता त्याच्या चित्रपटांबरोबरच त्याच्या भूतकाळातील रिलेशनशिपमुळेदेखील अनेकदा चर्चेत येतो.
अक्षय कुमार बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शेट्टीबरोबर रिलेशनशिपमध्ये होता. मात्र, कालांतराने त्यांचे ब्रेकअप झाले. शिल्पा शेट्टीने एका मुलाखतीत यावर वक्तव्य केले होते. अक्षय एकाच वेळी दोघींना डेट करत होता, असे ती म्हणाली होती. शिल्पा शेट्टी अक्षय कुमारबद्दल नेमकं काय म्हणाली होती, हे जाणून घेऊ…
“तो दुसऱ्या एखाद्या मुलीला…”
२००० साली Indya डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत शिल्पा शेट्टी म्हणालेली, “मी त्याच्यावर मनापासून प्रेम केले; पण मला त्याने फसवले. जेव्हा तुम्ही एखाद्यावर मनापासून प्रेम करता आणि तुम्हाला तो फसवतो, त्यावेळी खूप दु:ख होते. आम्ही रिलेशनशिपमध्ये असताना तो दुसऱ्या एखाद्या मुलीला डेट करेल, याची मी कधीच कल्पना केली नव्हती.”
असे म्हटले जाते की जेव्हा अक्षय कुमार शिल्पा शेट्टीबरोबर रिलेशनशिपमध्ये होता, त्यावेळी तो ट्विंकल खन्नाला डेट करत होता. शिल्पा शेट्टी त्यावेळी म्हणालेली की, धडकन हा चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत मी शांत बसले होते. तसेच, यासाठी इतर कोणत्याही मुलीला जबाबदार धरणे योग्य नसल्याचेदेखील म्हटले होते. अभिनेत्री म्हणालेली, “जर माझाच बॉयफ्रेंड मला फसवत असेल, तर इतर कोणत्या मुलीला दोष देऊन काय उपयोग आहे? या सगळ्यात पूर्णत: त्याची चूक आहे. अक्षय कुमारने माझा वापर केला आणि त्याच्या आयुष्यात दुसरी मुलगी आल्यानंतर त्याने मला सोडून दिले. मी त्याच्यावर नाराज आहे; इतर कोणावर नाही”, असे शिल्पा म्हणाली होती.
सुभाष के झा यांना दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमार शिल्पाबरोबरच्या ब्रेकअपबद्दल म्हणालेला, “हो आम्ही ब्रेकअप केले आहे. ब्रेकअप होत असतात, हा आपल्या आयुष्याचा भाग आहे. मला वाटते की, तिने तिच्या आयुष्यात पुढे जावे आणि मलाही जाऊ द्यावे. आता आम्ही वेगळो झालो आहोत. तिने माझ्यावर आरोप करणे थांबवले पाहिजे. तिच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांनी तिची दिशाभूल केली आहे. ती ज्या पद्धतीने बोलत आहे, वक्तव्ये करत आहे, ते मला आवडत नाही. तिच्यात खूप कटुता आली आहे. तिने तिच्या आयुष्यात पुढे गेले पाहिजे, हा माझा तिला सल्ला आहे.”
