scorecardresearch

भारताच्या नकाशावर पाय दिल्याने अक्षय कुमार ट्रोल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले…

Video: अक्षय कुमारच्या प्रमोशन व्हिडीओतील ‘त्या’ कृतीमुळे नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

akshay kumar troll
अक्षय कुमार ट्रोल. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार कायमच चर्चेत असतो. आताही एका व्हिडीओमुळे अक्षय कुमार चर्चेत आला आहे. अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अक्षय कुमार सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अक्षयने त्याच्या ऑफिशिअल सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे.

अक्षयने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये त्याच्यासह मौनी रॉय, दिशा पटानी, सोनम बाजवा व नोरा फतेही पृथ्वीवर चालताना दिसत आहे. ‘नॉर्थ अमेरिका टूर’साठी केलेल्या या प्रमोशन व्हिडीओमध्ये अक्षय भारताच्या नकाशावर चालत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

“भारताचा थोडा तरी आदर करायचा होता”, असं एकाने म्हटलं आहे.

तर दुसऱ्याने “लाज नाही वाटत का? भारतालाही नाही सोडलं तू कॅनडियन कुमार”, असं ट्वीट केलं आहे.

“ज्या देशात पैसा कमावला, त्याच देशाच्या नकाशावर पाय ठेवताना लाज वाटली नाही का?” असं म्हणत एकाने पंतप्रधान मोदींना टॅग करत यावर कारवाई करण्यास सांगितलं आहे.

‘नॉर्थ अमेरिका टूर’च्या प्रमोशनसाठी केलेला अक्षय कुमारचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरुन नेटकऱ्यांनी अक्षय कुमारला ट्रोल केलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 12:07 IST
ताज्या बातम्या