एकेकाळची लोकप्रिय अभिनेत्री व प्रसिद्ध लेखिका ट्विंकल खन्ना हिने आता तिच्या आयुष्यातील एक मनोरंजक किस्सा सांगितला आहे. हा किस्सा तिची मुलगी निताराशी संबंधित आहे. मुलगी निताराच्या रंगावर एका नातेवाईकाने टिप्पणी केली होती, असं ट्विंकलने तिच्या ब्लॉगमध्ये सांगितलं आहे. नातेवाईकाच्या त्या टिप्पणीनंतर निताराला पोहणं शिकायचं नव्हतं आणि अचानक तिला भाऊ आरवसारखं गोरं दिसायचं होतं, असं ट्विंकल म्हणाली.

‘द टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये लिहिलेल्या ब्लॉगमध्ये ट्विंकल म्हणाली, “एक वेळ अशी होती जेव्हा माझ्या लहान मुलीला पोहणं शिकणं थांबवायचं होतं. कारण तिची त्वचा काळवंडली होती. ‘मला दादासारखाच रंग हवा आहे.’ असं ती म्हणत होती. त्यामागचं कारण म्हणजे एका मूर्ख नातेवाईकाने केलेली टिप्पणी तिने ऐकली होती. ‘ती खूप गोंडस आहे पण तिच्या भावासारखी गोरी नाही,’ असं त्या नातेवाईकाने म्हटलं होतं.”

“स्तनांचा आकार वाढविण्यासाठी दबाव…”, बॉलीवूड अभिनेत्रीचा खुलासा; म्हणाली, “मी खऱ्या आयुष्यात…”

या प्रसंगानंतर आपण मुलीला फ्रिडा काहलोचं यांचं आत्मचरित्र वाचायला दिलं, असं ट्विंकलने सांगितलं. फ्रिडा या खूप गोऱ्या नव्हत्या, त्यांच्या दोन्ही भुवया आपसात जोडलेल्या होत्या, पण त्या प्रचंड हुशार होत्या. या पुस्तकामुळे चिमुकल्या निताराचे दिसण्याविषयीचे, रंगाविषयीचे तिचे विचार बदलले. आता ती म्हणते की तिला भावाइतकं सनब्लॉकर वापरावं लागत नाही, कारण तो गोरा आहे, त्यामुळे त्याला त्याच्या त्वचेची जास्त काळजी घ्यावी लागते. पांढरा रंग लवकर घाण होतो, पण तपकिरी व गडद रंग लवकर घाण होत नाहीत, असं नितारा म्हणते.

कुजलेल्या अवस्थेत आढळला काजोलच्या को-स्टारचा मृतदेह, तीन दिवस वाट पाहूनही कुटुंबीय न आल्याने अभिनेत्रीवर पोलिसांनी केले अंत्यसंस्कार

ट्विंकलने सांगितलं की तिला वाचनाची सवय तिचे वडील राजेश खन्ना यांनी लावली होती. तेही खूप पुस्तकं वाचायचे. माझ्या मुलीला पुस्तकं वाचायला शिकवणं सोपं नव्हतं. ट्विंकलने तिला पुस्तक वाचण्याची सवय लावण्यासाठी एक मनोरंजक उपाय शोधला. ट्विंकल निताराबरोबर पुस्तक वाचण्याची स्पर्धा करते. जेव्हा ट्विंकल म्हणते की ती पुस्तक वाचण्यात पुढे आहे, तेव्हा नितारा आणखी वेगाने वाचू लागते.

‘मुंज्या’ची तिसऱ्या दिवशीही जबरदस्त कमाई, ३० कोटींचे बजेट असलेल्या चित्रपटाने रविवारी कमावले तब्बल…

२००१ मध्ये अक्षय कुमारसोबत लग्न केल्यानंतर ट्विंकल खन्नाने अभिनय सोडला कारण तिला अभिनय करून आनंद मिळत नव्हता. तिला पुस्तकांची खूप आवड आहे आणि तिने अभिनय सोडल्यावर याच क्षेत्रात करिअर केलं. ट्विंकलने ‘वेलकम टू पॅराडाईज’ आणि ‘पायजामा फॉरगिव्हिंग’ यासह अनेक पुस्तकं लिहिली आहेत.