scorecardresearch

Premium

उत्तरकाशी बचाव मोहिमेवर अक्षय कुमार काढणार चित्रपट; सोशल मीडियावर मीम्सचा सुळसुळाट

भारतातच नव्हे तर जगभरात या गोष्टीची चर्चा होत आहे. सोशल मीडियावर तर खूप लोकांनी याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत

akshay-kumar-uttarkashi-rescue
फोटो : इंडियन एक्सप्रेस व सोशल मीडिया

उत्तराखंडमध्ये चारधाम प्रकल्पाचा भाग असलेल्या सिलक्यारा ते बारकोट या पाच किलोमीटरच्या बांधकामाधीन बोगद्याचा काही भाग १२ नोव्हेंबरला कोसळला. बोगद्याच्या सिलक्यारा दिशेकडील सुमारे ६० मीटरचा भाग खचल्याने ४१ कामगार अडकले होते. या मजुरांना बाहेर काढण्यासाठी सर्वात मोठे तज्ञ म्हणून ओळखले जाणारे अर्नोल्ड डिक्स यांना पाचारण करण्यात आलं होतं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे बचावकार्य पार पडलं असून त्या ४१ मजुरांना बाहेर काढण्यात आलं आहे.

भारतातच नव्हे तर जगभरात या गोष्टीची चर्चा होत आहे. सोशल मीडियावर तर खूप लोकांनी याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने याबद्दल एक्स या प्लॅटफॉर्मवर ट्वीट करत संपूर्ण बचावकार्य पार पाडणाऱ्या लोकांचे आभार मानले असून त्यांचे कौतुक केले. आता याच ट्वीटमुळे अक्षय कुमार पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.

After Shreyas Iyer was ruled out of Ranji Trophy 2024 due to back pain, the NCA made waves the next day by declaring him fit.
Ranji Trophy 2024 : रणजीपासून दूर राहण्यासाठी श्रेयसची पाठदुखीची खोटी तक्रार? एनसीएकडून पूर्णपणे तंदुरुस्त घोषित
Amol Kolhe in Loksabha Speech
“मी जय श्रीराम नक्कीच म्हणेन, पण…”, अमोल कोल्हे लोकसभेत कडाडले, मराठी भाषेतील काव्यात्मक भाषण चर्चेत!
kuno three cheetah cubs marathi news, kuno cheetah project marathi news, cheetah marathi news
विश्लेषण : कुनोतील चित्त्यांचे बछडे यंदा तरी जगतील का? अजूनही कोणती आव्हाने?
loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : एकाच अर्थसंकल्पात ५० वर्षांच्या गप्पा!

आणखी वाचा : ‘सरदार उधम’मधील हृदय पिळवटून टाकणाऱ्या ‘त्या’ सीनबद्दल विकी कौशल प्रथमच बोलला; म्हणाला, “तब्बल २० दिवस…”

सत्यघटनेवर आधारित अक्षय कुमार चित्रपट काढतो अन् यामुळेच आता अक्षय लवकरच या बोगद्यातील बचाव कार्यावरील चित्रपट काढणार अशी चर्चा रंगू लागली आहे. चित्रपटाचे नाव ‘द टनलमॅन’ असेल असंही काहींनी खोचकपणे ट्वीट करत लिहिलं आहे. अक्षयचं ट्वीट शेअर करत यावर चित्रपट कधी काढणार असाही काहींनी सवाल केला आहे. बायोपिक आणि सत्यघटनेवर आधारित चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अक्षय कुमारला चांगलंच ट्रोल केलं जात आहे.

इतकंच नव्हे तर अर्नोल्ड डिक्स यांच्या फोटोजागी अक्षयचा फोटो लावून चित्रपटाचे पोस्टरही काही लोकांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोशल मीडियावर या मीम्सचा चांगलाच सुळसुळाट पाहायला मिळत आहे. अद्याप या घटनेवर असा कोणता चित्रपट येणार आहे अशी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. अक्षय कुमार नुकताच ‘मिशन राणीगंज’ या चित्रपटात झळकला ज्यात तो कोळशाच्या खाणीत अडकलेल्या अशाच मजुरांना बाहेर काढताना दिसला, यामुळेच अक्षयला एका ट्वीटवरून एवढ्या ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Akshay kumar will make film on uttarkashi tunnel rescue operations memes viral on social media avn

First published on: 30-11-2023 at 16:14 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×