Ranveer Singh & Akshaye Khanna’s Networth : ‘धुरंधर’ प्रदर्शित झाल्यापासून सर्वत्र चर्चेत आहे. यातील कलाकार अक्षय खन्नाचं पात्र व गाणी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. रणवीर सिंहचंही त्याच्या कामासाठी अनेकांनी कौतुक केलं. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडत कोट्यवधींची कमाई केली आहे.

भारतासह ‘धुरंधर’ने जगभरातही कोट्यवधींची कमाई केली. २०२५ मध्ये हिट ठरलेल्या ‘छावा’, ‘कांतारा’, ‘सैयारा’ यांसारख्या चित्रपटांचे याने रेकॉर्ड मोडले. पण, तुम्हाला माहीत आहे का हे दोघे किती मानधन घेतात आणि या दोघांची नेटवर्थ किती आहे? तसेच दोघांमध्ये कोण श्रीमंत आहे याबद्दल जाणून घेऊयात…

रणवीर सिंहची नेटवर्थ किती?

‘बिझनेस टुडे’च्या अहवालानुसार रणवीर सिंहची नेटवर्थ जवळपास ४०० कोटी इतकी आहे. त्याची ब्रँड व्हल्यू १७०.७ मिलियन डॉरल आहे. न्यूज १८ च्या वृत्तानुसार रणवीर सिंह एका चित्रपटासाठी ३० ते ५० कोटी रुपये इतकं मानधन घेतो. याव्यतिरिक्त तो एका ब्रँडच्या जाहिरातीसाठी ३-५ कोटी इतकं मानधन घेतो. तर सोशल मीडियावरील एका पोस्टसाठी अभिनेता ८० लाख रुपये घेतो.

रणवीर सिंहकडे मुंबई येथे ४० कोटींचा ५ बीएचके अपार्टमेंट आहे. यासह त्याचा सी-फेसिंग बंगलाही आहे, ज्याची किंमत ११९ कोटी रुपये आहे. यासह त्याच्याकडे अजून एक अपार्टमेंट असून त्याची किंमत १६ कोटी रुपये इतकी आहे. यासह अलिबाग येथे त्याचा व दीपिका पादुकोणचा २२ कोटींचा आलिशान फार्महाऊसही आहे. रणवीरकडे महागड्या गाड्यांचं कलेक्शनही आहे.

किती श्रीमंत आहे अक्षय खन्ना ?

अक्षय खन्नाच्या नेटवर्थबद्दल बोलायचं झालं तर उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार अक्षय खन्ना १६७ कोटींचा मालक आहे. अक्षय खन्ना सोशल मीडियावर सक्रिय नाहीये, त्यामुळे तो सोशल मीडियावरून कठलीही कमाई करत नाही. पण, त्याचा जुहू येथे आलिशान बंगला आहे, तर रिअल इस्टेटमध्ये त्याची १०० कोटींहून अधिक गुंतवणूक आहे.

अक्षय खन्नाच्या कार कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर त्याच्याकडे बीएमडबल्यू ५ सीरिज, टोयोटा फॉर्च्यूनरसारख्या गाड्या आहेत. पण, अक्षय इतर बॉलीवूड कलाकारांसारखा लाईमलाईटमध्ये राहत नाही तर लाईमलाईटपासून दूर राहणं त्याला आवडतं.