Akshaye Khanna slap Aamir Khan : बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याने त्याच्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पडद्यावर भूमिका योग्य पद्धतीने मांडण्यासाठी आमिर नेहमीच प्रयत्न करत असतो. पण, एका भूमिकेमुळे त्याला एक-दोन वेळा नाही तर तब्बल १७ वेळा कानाखाली मारण्यात आली होती. ‘धुरंधर’फेम अक्षय खन्नाने आमिर खानला १७ वेळा कानाखाली मारली होती.
फरहान अख्तरच्या ‘दिल चाहता है’ या सिनेमाला नुकतीच २५ वर्षे पूर्ण झाली असून यानिमित्ताने यातील कलाकार पुन्हा एकदा एकत्र आले होते. यावेळी आमिर खानने सैफ अली खान व अक्षय खन्ना यांच्याबरोबर शूटिंगची आठवण सांगितली. या सीनमध्ये आमिर खानच्या भूमिकेला मार बसेल असा सीन होता. तो पडद्यावर योग्य पद्धतीने दिसावा म्हणून स्वतः आमिरने अक्षयला खरेखुरे मारण्याचा आग्रह केला होता. विशेष म्हणजे, हा सीन तब्बल १७ वेळा शूट करण्यात आला आणि प्रत्येक वेळी अक्षयने आमिरला खरोखरच कानाखाली मारली होती.
आमिर खानने स्वतः केला होता आग्रह
याबद्दल फरहान म्हणाला, “मी अक्षयला सांगितलं होतं की, आमिरला असे वाटेल की वाक्याच्या शेवटी त्याला मारेल जाईल, पण तू वाक्य पूर्ण होण्याआधीच त्याला मार, म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर अचानक मार बसल्याचे भाव दिसून येतील. पण, यावर आमिर खानने स्वतः सीन चांगला दिसण्यासाठी खरे मारण्याचा आग्रह केला. आमिर म्हणालेला, ‘आपण ओटीएस (ओव्हर द शोल्डर) शॉट करत असतानाही त्याला कानाखाली मारू दे. कारण त्यामुळे मला चांगला सीन देता येईल,’ त्यामुळे आमिरनेच स्वतःला मारण्याच आग्रह धरला होता.”
आमिरने पुढे याबद्दल अनुभव शेअर केला. तो म्हणाला, पण खरे मारण्याचा निर्णय योग्य ठरला. कारण- कोणत्याही अँगलने जेव्हा तुम्हाला खरा मार बसतो, तेव्हा त्यावर वेगळ्याच प्रकारच्या भावना जाणवतात, यामुळे सीन अजून चांगला वाटत होता.
पुढे फराहनने सांगितले की, “या सीनसाठी वारंवार मार खाल्ल्याच्या खुणा आमिरच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. शूटिंग संपेपर्यंत त्याच्या चेहऱ्याची एक बाजू पूर्णपणे सुजली होती. मला आठवतंय, शूटिंग संपलं तेव्हा आमिरच्या चेहऱ्यावर मोठी खूण तयार झाली होती आणि सूज आली होती.”
‘दिल चाहता है’ सिनेमाला २५ वर्षे पूर्ण
‘दिल चाहता है’ सिनेमातील एका सीनसाठी आमिर खानने त्रास सहन केला आणि १७ वेळा मार खाऊन घेतला होता. दरम्यान, २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. आमिर खान, सैफ अली खान आणि अक्षय खन्ना यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्याचबरोबर प्रीती झिंटा, डिंपल कपाडिया, सोनाली कुलकर्णी, रजत कपूर आणि अयुब खान यांनी स्क्रीन शेअर केली होती.
