Akshaye Khanna Viral Video: अक्षय खन्ना लवकरच ‘महाकाली’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता तो त्याच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे. त्याचा लूक लक्ष वेधून घेत असल्याचे दिसत आहे.
विरल भयानीने अक्षयचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की अक्षय त्याच्या मित्राला भेटून जात आहे. त्यावेळी पापाराझींनी त्याचे व्हिडीओ व फोटो काढले आहेत. अक्षय जाताना त्याच्या मित्राला भेटतो. तसेच, तो पापाराझींसाठी पोझही देताना दिसला.
अक्षय खन्नाचा व्हिडीओ व्हायरल
अक्षयने काळ्या रंगाचा टी-शर्ट, निळ्या रंगाची जीन्स घातली असल्याचे दिसत आहे. शर्टवर त्याने त्याचा गॉगल लावला आहे. तसेच, डोक्यावर पांढरा रुमाल बांधला आहे. या सगळ्याबरोबरच त्याची पांढरी दाढी लक्ष वेधून घेत आहे. त्यानंतर तो लगेच तिथून निघून जातो आणि त्याच्या गाडीत बसतो.
आता अक्षयचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. एकाने लिहिले, “हा माणूस कोणत्याही भूमिकेत फिट बसतो”, दुसऱ्या एकाने लिहिले, “मी स्वप्न पाहत आहे का? हा अक्षय आहे”, तर अनेक कलाकारांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.
दरम्यान, अक्षय खन्ना ‘महाकाली’ सिनेमात शुक्राचार्य ही भूमिका साकारत आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा सिनेमातील लूक पाहायला मिळाला होता. आता प्रेक्षक त्याच्या या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
