scorecardresearch

Premium

‘जवान’चं कलेक्शन शेअर करत खिलाडी कुमारने केलं किंग खानचं अभिनंदन; ट्वीट करत म्हणाला…

चित्रपटसृष्टीतील बऱ्याच लोकांनीही शाहरुख खानच्या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. कंगना, करीना, हृतिक ते थेट एसएस राजामौली यांनीही या चित्रपटाचं कौतुक केलं आहे

akshay-kumar-jawan
फोटो : सोशल मीडिया

शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट खूपच चांगला आहे, असं कौतुक प्रेक्षक करत आहेत. ‘जवान’ने पहिल्याच दिवशी दमदार कमाई केली. जगभरात ‘जवान’ने ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे.

बॉक्स ऑफिसवर ‘जवान’ छप्परफाड कमाई करत आहे. चित्रपटातील संवाद, तसेच काही सीन्सची सोशल मीडियावर जबरदस्त चर्चाही सुरू आहे. याबरोबरच चित्रपटसृष्टीतील बऱ्याच लोकांनीही शाहरुख खानच्या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. कंगना, करीना, हृतिक ते थेट एसएस राजामौली यांनीही या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

shahid-kapoor-haider
‘या’ चित्रपटासाठी शाहिद कपूरने घेतलं नव्हतं मानधन; मुलाखतीदरम्यान अभिनेत्याने सांगितलं कारण
rajamouli-made-in-india
‘भारतीय चित्रपटा’चा बायोपिक; एसएस राजामौलींच्या आगामी बिग बजेट चित्रपटाची घोषणा
why-kareena-loves-mumbai
मुंबई का आवडते? करीना कपूरने सांगितलं खरं कारण; म्हणाली “मला या शहरात…”
naseeruddin-shah-gadar2
“पुढच्या पिढीला…” ‘गदर २’ व ‘द काश्मीर फाइल्स’सारख्या चित्रपटांविषयी नसीरुद्दीन शाह यांनी व्यक्त केली नाराजी

आणखी वाचा : “मी आणि सैफ आम्ही दोघेही…” शाहरुख खानच्या ‘जवान’बद्दल करीना कपूरचं वक्तव्य

बॉलिवूडचा खिलाडी कुमार तरी यात कसा काय मागे राहील. अक्षयनेही नुकतंच ‘पिंकव्हीला’चं ट्वीट पुन्हा शेअर करत शाहरुखचे अभिनंदन केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये अक्षय म्हणतो, “माझा जवान पठाण शाहरुख खानचे त्याच्या चित्रपटाला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल मनापासून अभिनंदन. आपल्या चित्रपटांनी पुन्हा जबरदस्त कमबॅक केला आहे.” हे ट्वीट करताना अक्षयने ‘जवान’च्या कलेक्शनचे आकडेही शेअर केले आहेत.

‘जवान’ हा बॉलिवूडमधील सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा चित्रपट ठरला आहे. याआधी हा रेकॉर्ड शाहरुखच्या ‘पठाण’ आणि सनी देओलच्या ‘गदर २’च्या नावे होता. या दोघांना मागे टाकत ‘जवान’ने बाजी मारली आहे. या चित्रपटात शाहरुख खान, नयनतारा व विजय सेतुपती यांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय यामध्ये प्रियामणी, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोग्रा, आलिया, गिरीजा ओक यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय दीपिका पदुकोणचा कॅमिओदेखील आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Akshya kumar praises shahrukh khan starrer jawan shares its box office collection avn

First published on: 12-09-2023 at 11:13 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×