Alia Bhatt and Bobby Deol emotional moment at Chetak Screen Awards : आलिया भट्ट बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आलियाने मोठा पडदा, ओटीटी या माध्यमात काम केलं आहे. पण, तिने कधीच कुठल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं नव्हतं. आलियाने पहिल्यांदाच नुकत्याच पार पडलेल्या ‘चेतक स्क्रीन अवॉर्डस्’मध्ये सूत्रसंचालन केलं. या पुरस्कार सोहळ्यामध्ये बॉलीवूडमधील अनेक कलाकारांना वेगवेगळे पुरस्कार देण्यात आले. यामध्ये दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांचाही समावेश होता.
‘चेतक स्क्रीन अवॉर्डस्’मध्ये बॉलीवूडमध्ये अनेक दशकं आपल्या अभिनयाने आणि हटके स्टाईलने प्रेक्षकांचं मनोरंजन करत इंडस्ट्रीत स्वत:ची वेगली ओळख निर्माण केलेले दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला. त्यावेळी त्यांचा मुलगा लोकप्रिय अभिनेता बॉबी देओलनं हा पुरस्कार स्वीकारला. वडिलांच्या निधनाच्या काही महिन्यानंतर त्यांना पुरस्कार मिळाल्याने तो स्वीकारताना बॉबी देओलला स्टेजवर भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. वडिलांचा पुरस्कार स्वीकारताना बॉबी देओल भावुक होत व्यक्त झाला. त्याने त्याच्या भावना व्यक्त करत पुरस्कार स्वीकारल्या. त्यावेळी स्टेजवर उपस्थित सूत्रसंचालन करत असलेली आलिया भट्टसुद्धा भावुक झाल्याचं दिसलं. बॉबी देओलला भावुक होत बोलताना पाहिल्यानंतर आलिया भट्टच्या डोळ्यातही अश्रू आले.
आलिया भट्टने यापूर्वी कधीही सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली नव्हती. या पुरस्कार सोहळ्यात पहिल्यांदाच अभिनेत्रीने हा अनुभव घेतला असून सुनील ग्रोवर व झाकीर खान यांच्याबरोबर तिने या सोहळ्यात सूत्रसंचालन केलं. अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर पोस्ट करत तिचा अनुभवसुद्धा सांगितला आहे. यावेळी तिने सोहळ्यातील काही खास फोटोसुद्धा शेअर केले आहे.
५ एप्रिल रविवारी पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यामध्ये बॉलीवूडमधील अनेक लोकप्रिय कलाकारांनी हजेरी लावली होती. यामध्ये सोनाली बेंद्रे, राकेश बेदी, विकी कौशल, बॉबी देओल, अनुपम खेर, जावेद अख्तर, बोमन इराणी, अर्षद वारसी यांसारख्या अनेक कलाकारांचा समावेश होता.
पुरस्कार सोहळ्यामध्ये सिनेमा, ओटीटीवरील विविध चित्रपट आणि सिरीज तसेच त्यातील कलाकारांना विविध पुरस्कार मिळाले. परंतु ‘स्क्रीन अवॉर्डस्’मध्ये आदित्य धरच्या ‘धुरंधर’ या चित्रपटाचा बोलबाला होता. कारण चित्रपटाला एकूण १४ पुरस्कार प्राप्त झाले. यामध्ये राकेश बेदी, अक्षय खन्ना, रणवीर सिंह यांना पुरस्कार मिळाले. यासह इतरही मंडळींना या चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला.
