Video : वाढलेली दाढी, केस आणि...; लेक व बायकोला रुग्णालयामधून घरी आणलं अन् लगेचच कामावर परतला रणबीर कपूर | alia bhatt and her daughter return from hospital ranbir kapoor spot on film set video goes viral on social media | Loksatta

Video : वाढलेली दाढी, केस आणि…; लेक व बायकोला रुग्णालयामधून घरी आणलं अन् लगेचच कामावर परतला रणबीर कपूर

मुलीला रुग्णालयामधून घरी आणल्यानंतर रणबीर कपूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video : वाढलेली दाढी, केस आणि…; लेक व बायकोला रुग्णालयामधून घरी आणलं अन् लगेचच कामावर परतला रणबीर कपूर
मुलीला रुग्णालयामधून घरी आणल्यानंतर रणबीर कपूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आलिया भट्ट व रणबीर कपूरच्या बेबी गर्लची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. १० नोव्हेंबरला (गुरुवार) आलिया-रणबीर लाडक्या लेकीला रुग्णालयामधून घरी घेऊन आले. कपूर व भट्ट कुटुंबियांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. रुग्णालयामधून घरी येताना आलिया व रणबीरचे बरेच फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. रणबीर आपल्या लेकीला मांडीवर घेऊन बसलेला दिसला. आता रणबीरबाबत एक नवी माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा – अभिनेत्री सई ताम्हणकरचा पूर्वाश्रमीच्या पतीबाबत खुलासा, म्हणाली “त्या दिवशी रात्रभर दारू प्यायलो अन्…”

आलिया व रणबीरने आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. आलियाने तर काही दिवसांसाठी तरी कामामधून ब्रेक घेतला आहे. आता ती पूर्ण वेळ आपल्या लेकीबरोबर घालवणार आहे. पण रणबीरने काही वेगळाच निर्णय घेतला आहे. लेकीला घरी आणल्यानंतर तो काही तासांमध्येच कामावर परतला.

पाहा व्हिडीओ

आलिया व मुलगीला घरी आणल्यानंतर काही वेळ रणबीर आपल्या कुटुंबाबरोबर होता. पण त्यानंतर काही तासांमध्येच त्याच्या आगामी प्रोजेक्टच्या चित्रीकरणासाठी गेला. एका चित्रपटाच्या सेटवर रणबीर जेव्हा पोहोचला तेव्हा त्याला पापाराझी छायाचित्रकारांनी घेरलं. यादरम्यानचे त्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

आणखी वाचा – Video : “हा तर म्हातारा” वाढलेली पांढरी दाढी, शरीरयष्टी पाहून आमिर खानला ओळखणंही झालं कठीण, व्हिडीओ व्हायरल

वाढलेली दाढी, केस या नव्या लूकमध्ये रणबीर अगदी वेगळाच दिसत होता. निळ्या रंगाचा ड्रेस त्याने यावेळी परिधान केला असल्याचं पाहायला मिळालं. काम सांभाळातच रणबीर आपल्या मुलीलाही अधिकाधिक वेळ देणार आहे. एक त्याचं काम करणार तर दुसरा घरी मुलाजवळ थांबणार हे आधीच ठरलं असल्याचं आलियाने याआधी एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-11-2022 at 09:50 IST
Next Story
आधी बायकोची मैत्रीण, मग बांधली राखी अन्… अशी झालेली बोनी कपूर यांच्या आयुष्यात श्रीदेवी यांची एंट्री