अभिनेत्री आलिया भट्टने ६ नोव्हेंबरला गोंडस मुलीला जन्म दिला. काही महिन्यांपूर्वी आई-बाबा झालेले रणबीर कपूर व आलिया भट्ट बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहेत. आलिया-रणबीरने त्यांच्या लेकीचं नाव ‘राहा’ असं ठेवलं आहे. आलिया आणि रणबीरच्या लेकीची झलक पाहण्यासाठी सर्वच चाहते फार उत्सुक आहेत. त्यातच पहिल्यांदा आलिया-रणबीरची लेक सार्वजनिक ठिकाणी दिली आहे.
सध्या इन्स्टाग्रामवर आलिया आणि रणबीरचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत आलिया आणि रणबीर एका सार्वजनिक ठिकाणी राहाला घेऊन जात असल्याचे दिसत आहे. यावेळी आलियाने राहाला कुशीत घेतलं आहे. तिने तिला गुलाबी रंगाचे कपडे घातले आहेत.
आणखी वाचा : लेकीच्या जन्मानंतर आलिया भट्टने शेअर केला पहिला फोटो, पोस्ट व्हायरल
या फोटोत आलिया-रणबीरची लेक राहाचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. मात्र त्यात तिचे इटुकले पाय, गोरे-गोमटे हात दिसत आहे. यावेळी आलियाही फारच आनंदात पाहायला मिळत आहे. तर रणबीरही पत्नीबरोबर लेकीची काळजी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. इन्स्टंट बॉलिवूडने हा फोटो शेअर केला आहे.
आणखी वाचा : “राजकारणात जायला हवं” म्हणत अमृता फडणवीसांनी दिले संकेत, म्हणाल्या “मोठे नुकसान…”
आलिया व रणबीरने १४ एप्रिल २०२२ रोजी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. त्यानंतर काहीच महिन्यांत त्यांनी आई-बाबा होणार असल्याची गूडन्यूज चाहत्यांना दिली. आलिया भट्टने ६ नोव्हेंबरला दुपारी १२ ते १२.३० वाजता तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. आलिया आणि रणबीरला कन्यारत्न प्राप्त झाले. २०२३च्या एप्रिल महिन्यात त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होत आहे.