Video: मुलीच्या जन्मानंतर आलिया पहिल्यांदाच दिसली सार्वजनिक ठिकाणी, तिची अवस्था पाहून सर्वांनाच बसला धक्का | alia bhatt appeared first time in public after giving birth to daughter | Loksatta

Video: मुलीच्या जन्मानंतर आलिया पहिल्यांदाच दिसली सार्वजनिक ठिकाणी, तिची अवस्था पाहून सर्वांनाच बसला धक्का

काल संध्याकाळी आलिया भट्ट जुहूमध्ये तिच्या बहिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीला आली होती.

Video: मुलीच्या जन्मानंतर आलिया पहिल्यांदाच दिसली सार्वजनिक ठिकाणी, तिची अवस्था पाहून सर्वांनाच बसला धक्का

अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे सध्या सातत्याने चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. आलियाने काही दिवसांपूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतरही आलिया सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करताना दिसते. नुकतंच त्यांनी त्यांच्या लेकीचं बारसं केलं आणि तिचं नाव ‘राहा’ ठेवल्याचं सांगितलं. आता मुलीला जन्म दिल्यानंतर आलिया पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसली आहे. तिची अवस्था पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

२८ नोव्हेंबरला आलिया भट्टने तिची बहीण शाहीनसोबतचे दोन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. हे फोटो शेअर करत तिने शाहीनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हे तिचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच हिट झाले. आलियाची सासू नीतू कपूर यांनीही या फोटोवर कमेंट करत प्रतिक्रिया दिली होती. याचबरोबर काल संध्याकाळी आलिया भट्ट जुहूमध्ये तिच्या बहिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीला आली होती.

आणखी वाचा :सचिन तेंडुलकरची लेक सारा करतेय ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडला डेट? फोटो व्हायरल

ती विना मेकअप तिच्या कारमध्ये दिसली. यादरम्यान तिने तिला कम्फर्टेबल कपडे घातले होते. त्यावर तिने कानात सोनेरी रंगाचे सोबर कानातले घातले होते. मात्र, या दरम्यान तिची मुलगी राहा तिच्याबरोबर दिसली नाही. आपल्या मुलीला सांभाळ करण्यातून थोडा वेळ काढत ती बहिणीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला पोहोचली.

हेही वाचा : ब्रँडेड ज्वेलरीपासून ते चॉकलेट्सपर्यंत, ‘कॉफी विथ करण’च्या महागड्या गिफ्ट हॅम्परमध्ये काय असतं? जाणून घ्या

तिचा हा व्हिडीओ समोर आल्यावर अनेकांनी यावर आश्चर्य व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या. एका नेटकाऱ्याने लिहिलं, “आलियाचं सुंदर हास्य कुठे गेलं?” तर दुसऱ्याने लिहीलं, “आलिया खूप थकलेली दिसत आहे.” यासोबतचा अनेकांनी तिला बऱ्याच दिवसांनी पाहिल्याचा आनंदही व्यक्त केला. आलियाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 10:24 IST
Next Story
“काश्मिरी पंडितांच्या…” IFFI च्या ज्युरी प्रमुखांनी चित्रपटाचा ‘व्हल्गर’ उल्लेख केल्यानंतर ‘द काश्मीर फाइल्स’मधील अभिनेता संतप्त