SRK With Alia and Ranbir Kapoor Advertisement : सध्या मनोरंजन विश्वात लग्नसराई सुरू असल्याचं दिसत आहे. अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत. अशात बॉलीवूडचा किंग खान असलेला शाहरुख खान आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचं लग्न वाचवण्यासाठी प्रयत्न करतोय. तसा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. शाहरुख या दोघांना लग्न वाचवण्यासाठी सल्ला देत असल्याने त्यांच्या नात्यावरून तुमच्याही मनात आता अनेक प्रश्न आले असतील.

मात्र जरा थांबा, तुम्ही विचार करताय तसं या दोघांच्या नात्यात काहीही घडलेलं नाही. एका जाहिरातीनिमित्त शाहरुख खानने आलिया आणि रणबीरबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. त्यामध्ये तो लग्नासाठी या दोघांचं समुपदेशन करतोय.

Saif Ali Khan Sister Saba Ali Khan Pataudi emotional post
“भाईजान आम्हाला तुझा…”, सैफ अली खानसाठी बहिणीची भावुक पोस्ट, बालपणीचा फोटो शेअर करत म्हणाली…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
bollywood actors went to kareena home to meet her and kids
Video : सैफला भेटून बहिणीचे डोळे पाणावले! करण जोहर, रणबीरसह ‘हे’ बॉलीवूड कलाकार पोहोचले करीनाच्या भेटीला
kareena kapoor at lilavati hospital video viral
सैफ अली खानला भेटायला पोलिसांबरोबर रुग्णालयात पोहोचली करीना कपूर खान, Video Viral
Saif Ali Khan Attack News Saba Pataudi Shares health updates
सैफ अली खानवरील शस्त्रक्रिया पूर्ण; बहीण सबा पतौडीने दिली हेल्थ अपडेट, पोस्ट शेअर करत म्हणाली…
Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”

हेही वाचा : कुछ तो गडबड है दया…”! शिवाजी साटम यांचे छोट्या पडद्यावर पुनरागमन; ‘सीआयडी’चं नवीन पर्व ‘या’ तारखेपासून प्रेक्षकांच्या भेटीला

बॉलीवूडमधील अनेक चित्रपट आणि त्यातील काही पात्र प्रेक्षकांच्या फार आवडीची ठरतात. कितीही वर्षे झाली तरी चाहते आपल्या आवडत्या कलाकाराचे एखादे खास पात्र कधीच विसरत नाहीत. ‘ये जवानी है दिवानी’मधील बनी, ‘गली बॉय’मधील सफिना आणि ‘डियर जिंदगी’चा डॉ. जहांगीर ही पात्रेसुद्धा तशीच काहीशी आहेत. आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि शाहरुख खान अशी तीन तगड्या कलाकारांची जोडी एकाच चित्रपटात झळकणे म्हणजे चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच म्हणावी लागेल. अशात चित्रपटात नाही, पण एका जाहिरातीमध्ये तिघेही एकत्र झळकले आहेत.

या जाहिरातीमध्ये सुरुवातीला शाहरुख खान डॉ. जहांगीच्या वेशात समोर असलेलं एक घड्याळ पाहत आहे, तर आलिया भट्ट ‘गली बॉय’मधील सफिनाच्या वेशात त्याच्या समोर बनी म्हणजेच रणबीरची वाट पाहत बसली आहे. तितक्यात मस्त मजेत बनी तेथे पोहचतो. त्यावर शाहरुख म्हणजेच डॉ. जहांगीर दोघांना विचारतो, बनी सफिना तुमचं वैवाहिक आयुष्य कसं सुरू आहे?

त्यावर सफिना म्हणते, याला मी बर्फ आणण्यासाठी पाठवलं होतं, तर हा लडाखला गेला. कॉल इतका व्यस्त का? विचारलं तर सांगतो, माउंटर्स कॉलिंग… असं सफिना सांगते आणि पुढे “इतना गुलूगुलू करेगा…” हा ‘गली बॉय’ चित्रपटामधील डायलॉग म्हणते. तर त्यावर बनी म्हणतो, डॉ. जहांगीर मला उडायचं आहे, मला पळायचं आहे, फक्त या घरात नाही थांबायचं मला. त्यावर डॉ. जहांगीर विचारतात, पण का? त्यावर बनी म्हणतो, त्या दिवशी सनसेट पाहण्यासाठी घरावर गेलो तर त्याचा काही भाग तुटला. यावर पुढे बनी आणि सफिनामध्ये वाद होऊ लागतात. त्यावर डॉ. जहांगीर म्हणजेच शाहरुख खान म्हणतो, तुमच्या भांडणांवर माझ्याकडे एक उपाय आहे आणि त्यांना स्टीलचा एक रॉड देतो.

हेही वाचा : सैराट’ फेम रिंकू राजगुरूने केली नव्या चित्रपटाची घोषणा! मुहूर्त पडला पार, सेटवरचे फोटो केले शेअर

आता ही जाहिरात सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. जाहिरातीच्या निर्मात्यांवर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच या तिन्ही कलाकारांच्या चाहत्यांना ही जाहिरात फार आवडली असल्याचं कमेंटमध्ये म्हटलं आहे.

Story img Loader