अभिनेत्री आलिया भट्टने रणबीर कपूरबरोबर दोन वर्षांपूर्वी लग्न केलं. त्यानंतर तिचे जे चित्रपट आले, त्या सर्वांमध्ये तिचं नाव ‘आलिया भट्ट’ असंच होतं. सोशल मीडियावरही तिने नाव बदललेलं नाही. पण आता आलियाने तिचं नाव बदलल्याची घोषणा केली आहे.

आलिया भट्टचा ‘जिगरा’ हा नवा सिनेमा येतोय. याच सिनेमाच्या प्रमोशनसाठी ती ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ या कार्यक्रमात आली होती. याचा प्रोमो शनिवारी आला आहे. आलिया ‘जिगरा’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी अभिनेता वेदांग रैना आणि करण जोहर यांच्याबरोबर कपिल शर्माच्या शोमध्ये आल्याचं दिसतंय. याच कार्यक्रमात आलिया भट्टने तिचं नाव बदलल्याचं सांगितलं आहे.

हेही वाचा…Video : भावाच्या रक्षणासाठी काहीही, आलिया भट्टच्या बहुचर्चित ‘जिगरा’चा टीझर ट्रेलर प्रदर्शित; स्टंट्स आणि अ‍ॅक्शन…

आलियाने कपिल शर्मा शोमध्ये सांगितलं आहे की ती आता आलिया भट्ट कपूर असं नाव लावणार आहे. रणबीर कपूरशी लग्न केल्यावर दोन वर्षांनी आलियाने आपलं नाव बदललं आहे. ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’चा दुसरा सीझन २१ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या शोच्या एका प्रोमोमध्ये आलिया भट्ट दिसत आहे. यात सुनील ग्रोवर येतो आणि आलियाला विचारतो, “आप है आलिया भट्ट?” (तुम्ही आहात का आलिया भट्ट) यावर आलिया म्हणते, “मी आलिया भट्ट कपूर आहे.” या प्रोमोवरून आलियाने तिचं नाव बदलल्याचे अंदाज बांधले जात आहेत.

दरम्यान, आलिया भट्ट ‘जिगरा’ या तिच्या आगामी सिनेमात जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. वेदांग रैना तिच्या भावाच्या भूमिकेत असून, आपल्या भावाला वाचवण्यासाठी एक बहीण काय काय करू शकते, अशा आशयाची कथा असलेला हा सिनेमा आहे. नुकताच या सिनेमाचा टिझर-ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. आलियाने या सिनेमाची सहनिर्मिती केली आहे.

हेही वाचा…Video: राहा कपूरचा आवाज ऐकलात का? आजीला पाहून खूश झाली आलिया-रणबीरची लेक, म्हणाली…

‘जिगरा’ आणि ‘गुमराह’ मध्ये साम्य?

‘जिगरा’ या सिनेमाची कथा १९९३ मध्ये आलेल्या ‘गुमराह’ या सिनेमासारखी असल्याच्या चर्चा आहेत. ‘गुमराह’ सिनेमात संजय दत्त, राहुल रॉय, आणि श्रीदेवी यांच्या भूमिका होत्या. यात एक हिरो परदेशात तुरुंगात असलेल्या आपल्या प्रेयसीला वाचवण्यासाठी जातो, अशी कथा आहे. ‘जिगरा’मध्ये आलिया भट्ट परदेशात तुरुंगात असलेल्या आपल्या भावाला वाचवण्यासाठी जाते, असं या सिनेमाच्या टिझर-ट्रेलरवरून दिसतंय. मात्र ‘न्यूज १८’ ने दिलेल्या वृत्तानुसार ‘जिगरा’च्या निर्मात्यांनी हा सिनेमा कुठल्याही सिनेमावरून तयार केलेला नाही, असं सांगितलं आहे.

हेही वाचा…Video: रणदीप हुड्डाने VIP रांगेतून नाही, तर सर्वसामान्यांबरोबर गर्दीतून घेतले लालबागच्या राजाचे दर्शन, नेटकरी म्हणाले…

‘जिगरा’ सिनेमाचं दिग्दर्शन वासन बाला यांनी केलं असून, करण जोहर आणि आलिया भट्ट यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. हा सिनेमा ११ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.