scorecardresearch

Video: आधी हाय हिल्स काढले अन् मग अनवाणी पायांनीच ‘नाटू नाटू’वर थिरकली आलिया भट्ट, अभिनेत्रीचा रश्मिका मंदानाबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

आलिया भट्ट व रश्मिका मंदाना थिरकल्या ‘नाटू नाटू’वर, व्हिडीओ व्हायरल

alia bhatt video viral
आलिया भट्टचा व्हिडीओ व्हायरल. (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

आलिया भट्ट बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘ब्रह्मास्र’, ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘राझी’, ‘टू स्टेट्स’ अशा हिट चित्रपटांमधून आलियाने अभिनयाचा ठसा उमटवला. ‘आरआरआर’ हा चित्रपटही आलियाच्या सुपरहिट सिनेमाच्या लिस्टमध्ये आहे. या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट ओरिजिनल साँग या श्रेणीचा पुरस्कार मिळाला.

प्रसिद्ध उद्योजिका नीता अंबानी यांच्या ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेन्टर गाला’चं नुकतंच उद्घाटन करण्यात आलं. अंबानींच्या या कल्चरल सेन्टरच्या या उद्घाटन सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या सोहळ्यात आलिया भट्टने दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानासह ‘नाटू नाटू’ गाण्यावर ताल धरला. या सोहळ्यातील व्हिडीओ ‘विरल भय्यानी’ या पापाराझी पेजवरुन शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा>> परीक्षकांकडून झुकते माप, ट्रोलिंग अन्… ; ‘MasterChef India’ मध्ये झालेल्या आरोपांवर अरुणा विजय म्हणाली, “माझ्यावर खूप…”

आलिया व रश्मिका ‘नाटू नाटू’ गाण्याची हूक स्टेप करताना या व्हिडीओत दिसत आहेत. आरआरआर चित्रपटातील या गाण्यावर डान्स करण्यासाठी आलियाने चक्क स्टेजवरच तिचे हाय हिल्स काढले. चप्पल काढल्यानंतर आलियाने अनवाणी पायानेच ‘नाटू नाटू’ गाण्यावर डान्स केला. आलियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा>> “माझ्या कपड्यांमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या” उर्फी जावेदने मागितली चाहत्यांची माफी, म्हणाली “यापुढे…”

राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ चित्रपट मार्च २०२२मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. वर्षभरानंतरही या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याची क्रेझ आजही कायम आहे. राम चरण, अजय देवगण, ज्युनिअर एनटीआरसह या चित्रपटात आलिया भट्टनेही महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 10:49 IST

संबंधित बातम्या