Alia Bhatt Saree : आलिया भट्टच्या ‘Diwali’ लूकची सध्या सर्वत्र चर्चा चालू आहे. अभिनेत्रीचा फॅशन सेन्स कायमच तिच्या चाहत्यांना आकर्षित करतो. रुपेरी पडद्याप्रमाणे आलिया खऱ्या आयुष्यात सुद्धा तेवढीच ग्लॅमरस आहे. एकीकडे अलीकडच्या काळातले सेलिब्रिटी ‘वन फंक्शन, वन ड्रेस’ अर्थात एकदा घातलेले कपडे पुन्हा वापरत नाहीत. पण, आलियाच्या बाबतीत हे अगदी उलटं आहे. अनेकदा कपूर कुटुंबीयांची ही लाडकी सून एकदा वापरलेले कपडे पुन्हा वापरताना दिसते.

आलियाने तिच्या लग्नाची साडी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावर पुन्हा एकदा नेसली होती. तर, अभिनेत्रीने नुकताच मनिष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीला तिचा हळदी व संगीत समारंभाचा ड्रेस पुन्हा घातला होता. आता आलिया तिच्या आणखी एका साडीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दिवाळीला आलियाने गडद पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. अभिनेत्रीच्या प्लेन साडीवर हलकीशी डिझायनर बॉर्डर असल्याचं फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. तिने या साडीवर सोनेरी रंगाचा स्लीव्हलेस ब्लाउज घातला होता. तर, लेक राहा अन् रणबीरने सुद्धा तिला मॅचिंग असे कपडे घातले होते.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

आलिया भट्टच्या साडीचं वैशिष्ट्य

आलियाने नेसलेली साडी अमी पटेलने डिझाइन केलेली आहे. ही अतीव आनंद यांच्या रि-सेरेमोनिअल ब्रँडची साडी मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात अर्पण केलेल्या झेंडुच्या फुलांचा पुनर्वापर करून रंगवलेली होती. मंदिरात दररोज जमा होणाऱ्या फुलांचा पुनर्वापर करून पर्यावरणपूरक पद्धतीने या साड्या बनवल्या जातात. हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार अभिनेत्रीच्या साडीची किंमत तब्बल ८२ हजार ५०० रुपये आहे.

दरम्यान, आलिया भट्टच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर नुकतीच ती ‘जिगरा’ चित्रपटात झळकली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कामगिरी करू शकला नव्हता. आता येत्या काळात अभिनेत्री ‘अल्फा’ या यशराजच्या स्पाय युनिव्हर्समधील पहिला स्त्री-प्रधान चित्रपटात झळकणार आहे. यापूर्वीच्या ‘टायगर’, ‘पठाण’ आणि ‘वॉर’ सारख्या लोकप्रिय चित्रपट मालिकांच्या यशानंतर ‘अल्फा’मध्ये स्त्री पात्रांचा प्रमुख सहभाग दिसणार आहे. आलियाबरोबर या चित्रपट मराठमोळी अभिनेत्री शर्वरी वाघ झळकणार आहे.

Story img Loader