शुक्रवारी आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि नीतू कपूर यांनी त्यांच्या घरी गणपती विसर्जन केलं. यावेळी दोघे मुलगी राहाबरोबर विसर्जन करताना आणि पापाराझींसाठी फोटोसाठी पोझ देताना दिसले. गणपती विसर्जन दरम्यान आलिया भट्टच्या पारंपरिक लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तिचा हा एथनिक डिझायनर लूक या खास प्रसंगासाठी अगदी योग्य ठरला.

गुगल लेन्सच्या माध्यमातून केलेल्या शोधानुसार, आलिया भट्टने ‘Mulmul’चा कुर्ता-सलवार सेट परिधान केला होता. अधिकृत वेबसाइटनुसार, दुपट्ट्याशिवाय या सेटची किंमत १८,९५० रुपये आहे. मात्र, याबरोबर ऑर्गेन्झा फॅब्रिकचा ‘Shvi’ लाइट-ब्लू दुपट्टा घेतल्यास या सेटची एकूण किंमत २३,९०० रुपये होते. फ्युशिया आणि गोल्डन यलो हे रंग एकत्र पाहता थोडे वेगळे वाटू शकतात, पण या दोन्ही रंगांची जोडी खूप सुंदर दिसते. पिवळा आणि जांभळा हे रंग व्हीलवर एकमेकांच्या विरुद्ध असलेले रंग आहेत. मात्र, आलियाच्या या लूकमध्ये हे दोन्ही रंग एकमेकांना छान पूरक ठरले आहेत.

काय आहे आलियाच्या ड्रेसची खासियत?

हा सेट क्युप्रो सॅटिन (Cupro Satin) फॅब्रिकपासून तयार करण्यात आला आहे. ब्रँडच्या माहितीनुसार, ‘Shvi Kurta Set’मध्ये फ्युशिया रंगाचा शॉर्ट-कुर्ता आणि त्यासोबत सलवार देण्यात आली आहे. यामुळे लूकला साधेपणासोबतच एक आकर्षक आणि एलिगंट टच मिळतो. हा सेट छोट्या सणसमारंभांसाठी आणि कौटुंबिक कार्यक्रमांसाठी योग्य आहे. फॅब्रिक मऊ, हलकं आणि फ्लुइड असल्याने ते परिधान केल्यावर आरामदायी वाटतं. त्यावर हलकी चमकही दिसते. ब्रँडच्या माहितीनुसार, क्युप्रो हे वनस्पती-आधारित फॅब्रिक असून ते आकसण्याला आणि कपड्यावर छोटे गोळे येण्याला (pilling) प्रतिरोधक आहे. हे फॅब्रिक ओलावा शोषून घेणारं, आरामदायी आहे.

या खास प्रसंगी आलिया भट्ट अनवाणी होती. तिने केस बांधले होते आणि स्टेटमेंट इअररिंग्सने आपला लूक पूर्ण केला होता. तिच्याबरोबर रणबीर कपूरने ऑरेंज रंगाचा सिल्क कुर्ता आणि व्हाइट स्ट्रेट-फिट पँट परिधान केली होती. तर नीतू कपूर यांनी निळ्या रंगाचा कुर्ता सेट निवडला होता. राहा गुलाबी रंगाच्या शरारा सेटमध्ये खूपच गोंडस दिसत होती.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यापूर्वी ‘ब्रह्मास्त्र: पार्ट वन – शिवा’मध्ये एकत्र झळकले होते. आता दोघेही संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘लव्ह अँड वॉर’मध्ये पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. हा चित्रपट २०२७मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.