चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने स्वतःचं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री आलिया भट्ट ही आता लेखिला बनली आहे. आलियाने तिचं पहिलं पुस्तक लाँच केलं आहे. तिचं हे पुस्तक खास लहान मुलांसाठी आहे. याशिवाय ती अनेक पुस्तकांवर काम करत आहे, असंही आलियाने पहिल्या पुस्तकाच्या प्रदर्शनाच्या दिवशी सांगितलं.

अलीकडेच आलियाने तिच्या इन्स्टाग्रामवर या पुस्तकाविषयी माहिती शेअर केली आहे. ‘एड फाइंड्स अ होम’ असं आलियाच्या पुस्तकाचं नाव आहे. हे पुस्तक तिच्या लहान मुलांच्या कपड्यांचा ब्रँड एड-ए-मम्मापासून प्रेरित आहे. या सीरिजमधील हे पहिलं पुस्तक असून येत्या काळात आणखी पुस्तकं येतील. तन्वी भट्ट यांनी या पुस्तकासाठी खास चित्रं काढली आहेत.

जूनच्या तिसऱ्या आठवड्यात ‘हे’ चित्रपट अन् वेब सीरिज OTTवर होणार प्रदर्शित, वाचा यादी!

आलियाने इन्स्टाग्रामवर पुस्तकाबरोबरचा फोटो शेअर करून तिच्या नव्या भूमिकेबद्दल आनंद व्यक्त केला आहे. या फोटोमध्ये आलिया तिच्या पहिल्यावहिल्या पुस्तकासह पोज देत आहे. कॅप्शनमध्ये तिने या पुस्तकाबद्दल माहिती दिली. “एक नवीन रोमांच सुरू होत आहे. ‘एड फाइंड्स अ होम’ ही एड-ए-मम्माच्या जगातील पुस्तकांच्या नवीन सीरिजची सुरुवात आहे,” असं तिने लिहिलं.

“माझं बालपण कथा आणि कथाकारांनी भरलेलं होते आणि एके दिवशी मी माझ्या आतल्या त्या लहान मुलाला बाहेर काढण्याचं आणि मुलांच्या पुस्तकांमध्ये आणायचं स्वप्न पाहिलं, मी माझ्या सहकारी कथाकारांची मी आभारी आहे. त्यांनी त्यांचे उत्तम विचार, उत्कृष्ट कल्पना, इनपुट आणि कल्पनाशक्तीने आमचे पहिले पुस्तक जिवंत करण्यात मदत केली,” असं आलियाने लिहिलं.

Video : अवघ्या दीड वर्षांच्या राहा कपूरचं प्राणीप्रेम! रणबीरच्या लेकीची ‘ती’ कृती कॅमेऱ्यात कैद, व्हिडीओ व्हायरल

रविवारी आलिया भट्टच्या या पहिल्या पुस्तकाचा लाँचिंग सोहळा पार पडला. या कार्यक्रमात जमलेल्या लहान लहान मुलांनी आलिया व रणबीरची लेक राहासाठी अनेक गिफ्ट आणले होते. आलिया प्रेमाने ते गिफ्ट्स घेतना दिसली.