डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला अन् रणबीर कपूरने होणाऱ्या बाळासाठी घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या | alia bhatt mom to be after actress baby shower ranbir kapoor big decision actor take a break from movie see details | Loksatta

डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला अन् रणबीर कपूरने होणाऱ्या बाळासाठी घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या

आलिया भट्टचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. त्यानंतर रणबीर कपूरने मोठा निर्णय घेतला आहे.

डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला अन् रणबीर कपूरने होणाऱ्या बाळासाठी घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या
आलिया भट्टचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. त्यानंतर रणबीर कपूरने मोठा निर्णय घेतला आहे.

आलिया भट्ट व रणबीर कपूर सध्या आपल्या होणाऱ्या बाळासाठी प्लॅनिंग करत आहेत. आलियाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रमही नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला मोजक्याच मंडळींनी हजेरी लावली होती. यादरम्यानचे काही फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. व्हायरल फोटोंमध्ये आलियाचा प्रेग्नेंसी ग्लो दिसून आला. आलियाने सध्या कामामधून ब्रेक घेतला आहे. त्याचबरोबरीने रणबीरलाही खऱ्या आयुष्यामध्ये आदर्श वडील बनायचं आहे. म्हणूनच आता त्याने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

आणखी वाचा – Photos : प्राजक्ता माळीचं सुंदर घर पाहिलंत का? अभिनेत्रीनेच दाखवली झलक, पाहा काही खास फोटो

२०२२ हे वर्ष आलिया-रणबीरसाठी लकी ठरलं आहे. वर्षाच्या सुरुवातीला लग्न, त्यानंतर सुपरहिट चित्रपट अन् आता नव्या पाहुण्याची चाहुल. या सेलिब्रिटी कपलच्या आयुष्याला आता नव्याने सुरुवात होणार आहे. म्हणूनच रणबीर आपलं बाळ घरी येण्यापूर्वी संदीप रेड्डी दिग्दर्शित ‘एनिमल’ चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण करणार आहे.

ईटाइम्सच्या वृत्तानुसार, ‘एनिमल’ चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर रणबीर आपल्या कामामधून काही काळासाठी ब्रेक घेणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर तो कोणताच चित्रपट साइन करणार नाही. कारण रणबीरला आपल्या होणाऱ्या बाळाला अधिकाधिक वेळ द्यायचा आहे.

आणखी वाचा – Video : पत्नीला पाहताच मिठी मारली अन् रडू लागले अमिताभ बच्चन, पण नेमकं काय घडलं? व्हिडीओ व्हायरल

या महिन्यामध्येच ‘एनिमल’च्या चित्रीकरणाला सुरुवात होईल. तसेच रणबीर लवकरात लवकर चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. आलिया-रणबीरचा १४ एप्रिलला विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर जून महिन्यामध्येच आपण गरोदर असल्याचं आलियाने सोशल मीडियाद्वारे सांगितलं. आता हे दोघं आई-वडील म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
‘आदिपुरुष’ प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात, मात्र प्रभास-सैफ अली खानने घेतलं कोट्यवधी रुपयांचं मानधन

संबंधित बातम्या

“दाक्षिणात्य चित्रपट चोरता आता…” ‘सामी सामी’ गाण्यावरून बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीला केलं ट्रोल, video viral
सुजलेला चेहरा, अशक्तपणा अन्…; अभिनेत्री श्रुती हसनची अशी अवस्था का झाली? आजारपणातील फोटो शेअर करत म्हणाली…
अरबाज खानचं गर्लफ्रेंडशी ब्रेकअप? जॉर्जिया एंड्रियानीच्या वक्तव्याने चर्चांना उधाण; म्हणाली, “आमचं नातं….”
“ती अतिशय…” शम्मी कपूर यांची एक अट अन् मुमताज यांनी संपवलं होतं नातं
‘गॉडफादर’च्या निर्मात्यांवर ‘या’ कारणामुळे भडकला सलमान खान, म्हणाला, “इथून चालते…”

व्हिडिओ

ताज्या बातम्या
श्रद्धा वालकर हत्या प्रकरण : आफताबच्या ‘नार्को’ चाचणीस न्यायालयाची परवानगी; हल्ला झाल्याने बंदोबस्तात वाढ
पंजाबमध्ये पाकिस्तानचे ड्रोन पाडले; ‘बीएसएफ’च्या महिला पथकाची कामगिरी
चिनी विद्यापीठांतून विद्यार्थ्यांची परत पाठवणी; करोना प्रसार टाळण्यासाठी खबरदारी
आरक्षित जागांवरील बिगरआदिवासी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे लाभ
आदित्य यांचे मुख्यमंत्र्यांना चर्चेचे आव्हान; ‘वेदांत-फॉक्सकॉन’ प्रकल्पाचा वाद