बॉलीवूडची लाडकी अभिनेत्री आलिया भट्ट आपल्या वेगवेगळ्या भूमिकांतून नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते. आता ती लवकरच ‘अल्फा’ या हेरगिरीवर आधारित चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महिलांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात आलिया भट्ट आणि शर्वरी आपल्या अभिनयाची झलक दाखवताना दिसणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले जात होते. आता नुकतीच निर्मात्यांनी या चित्रपटाच्या टायटलची घोषणा केली आहे. अल्फा असे या चित्रपटाचे नाव असल्याचे सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमधून प्रेक्षकांना माहिती दिली आहे. यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील हा हेरगिरीवर आधारित चित्रपट आहे.

ORRY deepika padukone ranveer singh
ओरीने दीपिका पदुकोणच्या बेबी बंपवर हात ठेवला अन्…; फोटो व्हायरल होताच चाहते म्हणाले, “खोटं नाही आहे…”
vivek oberoi says after bollywood ostracized him he focused on business
बॉलीवूडने बहिष्कार टाकल्यावर व्यवसाय करून घर चालवलं; विवेक ओबेरॉय वस्तुस्थिती मांडत म्हणाला, “आज २९ कंपन्यांमध्ये…”
haldi ceremony marathi singer rahul vaidya performance with ranveer singh
“वन टू का फोर…”, अंबानींच्या समारंभात दुमदुमला मराठमोळ्या गायकाचा आवाज! सोबतीला होता रणवीर सिंह, पाहा व्हिडीओ
Mukesh Ambani invited to Marathi actor Shreyas Raje on him son Anant Ambani wedding
मुकेश अंबानींनी ‘या’ मराठी अभिनेत्याला दिली मुलाच्या लग्नाची पत्रिका, फोटो शेअर करत म्हणाला, “आता जावं लागेल लग्नाला…”
Suchitra Krishnamoorthi attended naked party
बर्लिनमध्ये Naked Party मध्ये सहभागी झाली बॉलीवूड अभिनेत्री, २० मिनिटांत काढला पळ; म्हणाली, “मला कुणाचेही प्रायव्हेट पार्ट…”
pooja khedkar ias news in marathi
IAS पूजा खेडकर यांचे कारनामे दिल्लीपर्यंत पोहोचले; थेट पंतप्रधान कार्यालयानं घातलं लक्ष, LBSNAA नंही मागवला अहवाल!
riteish deshmukh greets madhuri dixit
Video : अंबानींच्या समारंभात माधुरी दीक्षितला पाहताच रितेश देशमुखने केलं असं काही…; अभिनेत्याचं सर्वत्र होतंय कौतुक
meezaan jaffrey anant radhika wedding
‘या’ अभिनेत्याने राधिका-अनंतची करून दिली ओळख? मुकेश अंबानींनी त्याला ३० कोटींची दिली भेटवस्तू? त्याचे वडील म्हणाले…

समोर आलेल्या माहितीनुसार, आलियाला गुप्तहेराच्या भूमिकेसाठी ४ महिन्यांपासून ट्रेनिंग दिले आहे. ५ जुलैपासून आलिया भट्ट या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. आजपर्यंत कोणत्याही चित्रपटात तिचा पाहिला नसलेला अवतार या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तिने जी भूमिका साकारली आहे, त्यासाठी तिने खूप मेहनत घेतली असल्याचे म्हटले जात आहे. आलिया आणि शर्वरी यांच्याशिवाय या चित्रपटात बॉबी देओल देखील दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आलिया भट्ट आपल्या लाडक्या लेकीमुळे म्हणजेच राहामुळे चर्चेत होती. एका मुलाखतीदरम्यान तीने असे म्हटले होते की, राहाला ज्या गोष्टींमध्ये सहजता वाटणार नाही, अशा गोष्टी तिने करु नयेत. तिने अशी कोणतीही गोष्ट करु नये ज्यामुळे तिला अवघडलेपण वाटेल. याबरोबरच तिने राहाच्या रोजच्या दिवसातील कोणत्या गोष्टी कॉमन असतात, याबद्दल देखील वक्तव्य केले होते. रोज गोष्टी ऐकणे आणि बाहेर फिरायला जाणे हे तिच्या रोजच्या दिवसातील महत्वाच्या बाबी असल्याचे तिने म्हटले होते.

दरम्यान, आलिया भट्ट या चित्रपटाशिवाय रणबीर कपूर आणि विकी कौशल यांच्याबरोबर संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात दिसणार आहे. याबरोबरच, नुकतीच ती अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्याला रणबीर आणि आलिया यांनी एकमेकांना मॅचिंग होणारे कपडे परिधान केले होते. आता आलियाचा अल्फा चित्रपट चित्रपटातील सुपर एजेंटची भूमिका प्रेक्षकांना भूरळ पाडण्यात यशस्वी होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.