बॉलीवूडचं लोकप्रिय कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट अनेकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. दोघांचेही चित्रपट नेहमी हिट ठरतात. या दोघांना इंडस्ट्रीमधलं आदर्श कपल म्हणून ओळखलं जातं. रणबीर-आलियाच्या आयुष्यात राहा आल्याने दोघांचं आयुष्य अगदी बदलून गेलंय. राहा त्यांच्या आयुष्यात आल्यानंतर रणबीरमध्ये एक वडील म्हणून कशाप्रकारे बदल झाला, याबद्दल आलियाने सांगितलंय.

आलिया भट्टने नुकतीच इंडियन एक्स्प्रेसला मुलाखत दिली. जेव्हा आलियाला विचारण्यात आलं की, वडील म्हणून रणबीर कपूरचा असा कोणता पैलू आहे, ज्याने तुला आश्चर्य वाटलं.

हेही वाचा… आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा नव्हे तर ‘ही’ ठरली २०२४ मधली सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री, पाहा यादी

यावर आलिया म्हणाली, “मला नेहमीच असं वाटायचं की तो एक चांगलाच पिता बनणार आहे. दोघांचं बाँडिंग खूप स्पेशल आहे. राहा आणि रणबीर नेहमीच एकमेकांना त्रास देत असतात. दोघंही एकमेकांबरोबर मजेशीर गप्पा मारतात आणि हसत असतात.

आलिया पुढे म्हणाली, “रणबीरच्या अशा एका पैलूबद्दल सांगायचं झालं, तर राहाच्या फॅशनच्या निवडीबद्दल रणबीर खूप ???विशिष्ट???(की सजग) आहे. मला रणबीरला विचारावं लागतं की, रणबीर आज राहाने कोणते कपडे घालायला हवे? मग रणबीर येतो आणि वॉर्डरोबमध्ये बघून तिचे कपडे निवडतो. तो या सगळ्यामध्ये खूप गुंतलेला असतो. तुम्ही सगळे हा विचार करत असाल की राहाला मी तयार करत असेन, पण मी हे सगळं त्याच्याकडे सोपवते. तो हे सगळं खूप उत्तमरीत्या सांभाळतो. “

हेही वाचा… VIDEO: “ए राजाजी…”, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतील अभिनेत्रींनी केला भन्नाट डान्स, ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “विरोचकाचा मृत्यू…”

रणबीर आणि आलियाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं, तर एकमेकांना चार वर्ष डेट केल्यानंतर या स्टार कपलने एप्रिल २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नाच्या सात महिन्यांनंतर दोघांच्या जीवनात चिमुकल्या मुलीचं म्हणजेच राहाचं आगमन झालं.

हेही वाचा… “मी कॅमेरासमोर नग्न…”, ‘हीरामंडी’मधील ‘त्या’ सीनबद्दल ‘या’ अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली,”खूप निर्लज्ज..”

दरम्यान, रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर ‘लव्ह अ‍ॅंड वॉर’ या आगामी चित्रपटात रणबीर झळकणार आहे, तर ‘रामायण’ या चित्रपटात रणबीर साई पल्लवीबरोबर झळकणार आहे. आलिया भट्ट ‘जिगरा’ या चित्रपटाद्वारे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा… ‘पुष्पा-२’ चित्रपटाची तारीख बदलली, संतप्त चाहत्याने थेट निर्मात्यांना दिली ‘ही’ धमकी