Alia & Ranbir Anniversary : आलिया भट्ट व रणबीर कपूर यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या लग्नाला चार वर्षे झाली आहेत. यानिमित्ताने आलियाने रणबीरबरोबरचे खास फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर सर्वत्र त्यांचे फोटो पाहायला मिळत आहेत.

आलिया व रणबीर कपूर बॉलीवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी कपलपैकी एक आहेत. या जोडीने १४ एप्रिल २०२२मध्ये लग्न केलं. लग्नानंतर त्यांची मुलगी राहाचा जन्म झाला. अशातच आता या दोघांच्या लग्नाला चार वर्षे पूर्ण झाली असून लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आलियाने ऑस्ट्रियामधील त्यांचे खास फोटो शेअर केले आहेत. दोघांनी एकत्रित हा खास दिवस साजरा केल्याचं तिने शेअर केलेल्या फोटोंमधून पाहायला मिळत आहे. 

आलियाने रणबीर व लेक राहा यांच्याबरोबरचे फोटो शेअर करत त्याला छान कॅप्शन दिली आहे. अॅनिव्हर्सरीसाठी तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये दोघेही ऑस्ट्रियामध्ये स्कीइंग करताना दिसत आहेत. थंडीत गरम कॉफीचा आनंद घेत, कँडललाईट डिनर आणि मजा करत अशा सुंदर क्षणांनी त्यांनी हा खास दिवस साजरा केल्याचं या फोटोंमधून दिसत आहे.’एनडीटीव्ही’च्या माहितीनुसार  हे सगळं त्यांनी Lech या ऑस्ट्रियातील छोट्या गावात, निळ्याशार आकाशाखाली आणि निसर्गाच्या  सान्निध्यात अनुभवलं.

आलियाने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये रणबीर, राहा आणि  तेथील अल्पाका प्राणी दिसत आहेत. त्या फोटोमध्ये Fernsicht नावाच्या स्की रिसॉर्टमधील एक अपार्टमेंटही दिसत आहे. हे एक स्की रिसॉर्ट आहे, जिथे पर्यटकांसाठी वेगवेगळ्या आकारांची अपार्टमेंट्स भाड्याने दिली जातात. इथे एकूण ११ पर्याय आहेत, ज्यांचे आकार ४८ चौ. मी. ते ११९ चौ. मी. इतके आहेत.

या अपार्टमेंटमध्ये साधं इंटीरियर, लाकडी फ्लोअरिंग आणि आधुनिक सुविधा आहेत. स्वयंपाकघरात कॉफी मशीन, डिशवॉशर आहे. यासह तिथे पार्किंगची सोय आहे तेथील अधिकृत वेबसाईटवर २०२५ साठी सर्व अपार्टमेंट्सचे दर दिले आहेत, मात्र ११९ चौ. मी.च्या अपार्टमेंटचा दर दिलेला नाही. ऐरवी (२८ मार्च ते ६ एप्रिल २०२६) प्रति रात्रीचा खर्च १०७० युरो (सुमारे १.१७ लाख रुपये) ते १३१० युरो (सुमारे १.४३ लाख रुपये) इतका आहे.

एका रात्रीचे भाडे किती?

मात्र आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे तिथे अशा सीझनमध्ये गेले जेव्हा दर कमी असतात, म्हणजे ७ एप्रिल ते १९ एप्रिल दरम्यान प्रति रात्रीचा खर्च ७९० युरो (सुमारे ८६,६७० रुपये) ते ८५० युरो (सुमारे ९३,२५२ रुपये) इतका होता. 

सध्या हे दोघे संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटासाठी शूटिंग करत आहेत. हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.यामध्ये त्यांच्याबरोबर विकी कौशलसुद्धा असणार आहे.