Jeh Ali Khan Birthday Party : करीना कपूर-खान आणि सैफ अली खानने छोटा मुलगा जेहच्या वाढदिवसाची पार्टी नुकतीच आयोजित केली होती. या पार्टीमध्ये बॉलीवूड सेलिब्रिटींची मुलं सहभागी झाली होती. मुकेश अंबानींची मोठी सून श्लोका मेहता आपल्या मुलांना वेदा आणि पृथ्वीला घेऊन जेहच्या वाढदिवसाच्या पार्टीला पोहोचली होती. पण, जेह अली खानच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये चांगलीच भाव खाऊन गेली राहा कपूर. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लेकीचा वाढदिवसाच्या पार्टीतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होतं आहे.
जेह अली खानच्या वाढदिवसाच्या पार्टीत जादूचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी जादूगार आपल्या हटके, अनोख्या जादूने उपस्थित मुलांचं मनोरंजन करताना पाहायला मिळाला. याप्रमाणेचं जादूगार राहा कपूरबरोबर जादू करताना दिसला, पण तिने अशी काही प्रतिक्रिया दिली; ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तसंच राहाची ही प्रतिक्रिया पाहून अनेकांना ऋषी कपूर आठवले आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये जादूगार आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लेकीबरोबर जादू करताना दिसत आहे. तो राहाच्या डोक्यावर बॉटल ठेवून तिचं डोकं हलवताना पाहायला मिळत आहे. पण, यावेळी राहा कपूर आपल्या पाण्याच्या बॉटलबरोबर खेळताना दिसत आहे. त्यानंतर जादूगार एका बॉटलमधून पांढऱ्या रंगाचा उंदीर काढतो. तरीही राहा त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देत नाही आणि ती गुपचूप पाण्याच्या बॉटलबरोबर खेळत निघून जाते. राहाच्या या व्हिडीओची सध्या खूप चर्चा रंगली आहे.
rarabean ??? pic.twitter.com/vbadgg8Wnb
— ? (@softiealiaa) February 16, 2025
राहाच्या व्हायरल व्हिडीओवर एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया दिली की, हाहा…राहा ऋषि कपूर यांच्यासारखी आहे. लवकर इम्प्रेस होत नाही. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “राहा पूर्णपणे ऋषि कपूर यांच्यासारखीच झाला आहे.” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, राहाला ते मनोरंजनात्मक वाटलं नसेल.
दरम्यान, जादूगारने सोशल मीडियावर जेह अली खानच्या वाढदिवसाच्या पार्टीतला एक फोटो शेअर करत लिहिलं, “जेहच्या वाढदिवसाच्या पार्टीत परफॉर्मन्स केला होता.” याआधी करीनाने जेहच्या वाढदिवसाच्या पार्टी बाहेर पापाराझींना पोज देताना पाहायला मिळाली. त्यानंतर करीनाने पापाराझींना मुलांचे फोटो काढण्याची विनंती केली होती.