scorecardresearch

रणवीर-आलिया भट्टच्या बहुप्रतीक्षित चित्रपटाला अखेर मिळाला मुहूर्त; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटात आलिया कतरिना कैफ आणि प्रियांका चोप्रा यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस
फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस

आलिया भट्ट ही तिच्या लग्नापासून चांगलीच चर्चेत आहे. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यातच तिने ती आई होणार असल्याची बातमी तिने चाहत्यांशी शेअर केली. तर तीन महिन्यांपूर्वीच तिला कन्यारत्न प्राप्त झालं. आता काही महिने कामातून ब्रेक घेत ती पालकत्व एन्जॉय करताना दिसतेय. लवकरच ती आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. तिच्या आगामी चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.

आलिया भट्टला मागचे वर्ष लकी ठरले, मागच्या वर्षी तिचे लग्न झाले तसेच तिचा बहुचर्चित ब्रह्मास्त्र चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. आता ती यावर्षी करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर रणवीर सिंग झळकणार आहे. आता हा चित्रपट २८ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

सचिनसुद्धा शून्यावर…” ‘सर्कस’ चित्रपटाच्या अपयशावर सिद्धार्थ जाधवची प्रतिक्रिया चर्चेत

या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख याआधीदेखील दोनदा बदलण्यात आली होती. हा चित्रपट एप्रिल २०२३ साली प्रदर्शित होणार होता मात्र आज चित्रपटाच्या निर्मात्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चित्रपटाची तारीख जाहीर केली आहे. करण जोहर तब्बल सात वर्षांनंतर पुन्हा दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटात रणवीर आलिया व्यक्तिरित धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी यांसारखे ज्येष्ठ कलाकारही आहेत. जया बच्चन रणवीर सिंगच्या आजीची भूमिका साकारत असून शबाना आझमी आलियाच्या आजीच्या भूमिकेत दिसणार अशी चर्चा आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 19:41 IST