scorecardresearch

Premium

“सॉरी…” IIFA पुरस्कार मिळाल्यानंतर आलिया भट्टने मागितली माफी; म्हणाली ‘या’ कारणामुळे…

‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटासाठी अभिनेत्री आलिया भट्टला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ‘आयफा पुरस्कार’

alia bhatt
'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटासाठी अभिनेत्री आलिया भट्टला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा 'आयफा पुरस्कार' ( फोटो : इंडियन एक्स्प्रेस )

अभिनेत्री आलिया भट्टने यंदा ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ‘आयफा पुरस्कार’ (IIFA 2023) जिंकला आहे. परदेशात संपन्न झालेल्या ‘आयफा पुरस्कार’ सोहळ्याला आलिया काही कारणास्तव उपस्थित राहू शकली नव्हती. इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने याबाबत माहिती देत दिलगिरी व्यक्ती केली आहे.

हेही वाचा : “चाळीतलं बालपण, शिवाजी पार्क ते बालमोहन शाळा…” प्रिया बापटचा थक्क करणारा प्रवास; म्हणाली, “दादर म्हणजे…”

amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
bachchu kadu on pankaja munde
“…म्हणून पंकजा मुंडेंवर कारवाई झाली असावी”, बच्चू कडूंचं थेट विधान

आलिया भट्टने ‘आयफा’ २०२३ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकल्यावर इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाही यासाठी तिने सर्वांची माफी मागितली असून ‘आयफा’चे आभार मानले आहे. आलियाने लिहिले आहे की, “आयफाचे खूप खूप आभार…स़ॉरी, मी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी वैयक्तिकरित्या उपस्थित राहू शकले नाही. सर्व प्रेक्षकांना मन:पूर्वक धन्यवाद तुम्ही कायम पाठिशी आहात म्हणून हे शक्य झाले. तुम्ही दाखवलेल्या प्रेमामुळे मी आणि चित्रपटाची संपूर्ण टीम आज आनंदी आहे.”

हेही वाचा : “पावसाळ्यात प्लास्टिकची सोय केलीस…” IIFA पुरस्कार सोहळ्यातील ‘त्या’ ड्रेसमुळे नोरा फतेही ट्रोल

आलिया भट्टला कौटुंबिक कारणामुळे ‘आयफा’ पुरस्कार सोहळा रद्द करावा लागला अशी माहिती काही मीडिया रिपोर्ट्सने दिली आहे. टाईम्स ऑफ इंडिया या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, आलियाची आई सोनी राजदान यांचे वडील नरेंद्र राजदान गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांना फुफ्फुसात संसर्ग झाल्याच्या कारणामुळे रुग्णालयात भरती करण्यात आले होते. म्हणूनच आलिया सोहळ्याला उपस्थित राहू शकली नाही. तिच्या वतीने निर्मात्या जयंतीलाल गडा यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

हेही वाचा : कमल हासन यांनी ‘द केरला स्टोरी’ला प्रोपगंडा म्हटल्यावर दिग्दर्शक सुदीप्तो सेन संतापले; म्हणाले, “चित्रपट न पाहता…”

गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटात आलिया भट्टबरोबर अजय देवगण, शंतनू माहेश्वरी, विजय राज, सीमा भार्गव, इंदिरा तिवारी आणि जिम सरभ यांच्या भूमिका आहेत. तसेच आलिया लवकरच रणवीर सिंहबरोबर ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय आलिया ‘जी ले जरा’मध्ये प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफसह मुख्य भूमिकेत दिसेल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-05-2023 at 18:50 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×