Aliya Bhatt Glowing Skin Secret : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मुळे चर्चेत आली आहे. रेड कार्पेटवरील तिच्या स्टायलिश लूकबरोबर तिच्या ग्लोइंग आणि नैसर्गिक त्वचेचीही चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. नेहमी फ्रेश दिसणारी आलिया तिच्या त्वचेची काळजी नेमकी कशी घेते, तिच्या ब्युटी रुटीनमध्ये काय खास आहे आणि चमकदार त्वचेमागचं रहस्य आता उघड झालं आहे.

आलिया भट्ट दुसऱ्यांदा ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये गेली आहे. अभिनेत्रीने यावेळीसुद्धा काही हटके लूक करत तिच्या जगभरातील चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. आलियाच्या सर्व लूकची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. कान्समध्ये आलियाने अनेक माध्यमांशी संवाद साधत तिचा तेथील अनुभव आणि लूकबद्दल सांगितलं. अशातच ‘आज तक’च्या वृत्तानुसार तिने एका मुलाखतीत तिच्या ग्लोइंग त्वचेमागचं रहस्य सांगितलं आहे. यासह ती एक खास पदार्थाचंही सेवन करते असंही म्हटलं आहे. आलिया ग्लोइंग त्वचेसाठी नेमकं काय करते ज्यामुळे तिचे अनेक लूक व्हायरल होत असतात याबद्दल जाणून घेऊयात…


ग्लोइंग त्वचेसाठी आलिया भट्ट काय करते?

आलिया तिच्या ग्लोइंग त्वचेसाठी कुठली परदेशी गोष्ट वापरत नसून भारतीय पदार्थ असल्याचं सांगितलं आहे. उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार आलिया जी गोष्ट तिच्या ग्लोइंग त्वचेसाठी वापरते ती आहे तूप. एका विदेशी मासिकाशी संवाद साधताना आलिया म्हणाली, “तूप एक अशी गोष्ट आहे जी आमच्या घरामध्ये खूप वापरली जाते आणि अनेक लोक त्याचा वापर जेवण बनवताना करतात. फक्त गट्ससाठी नव्हे तर त्वचेसाठीसुद्धा खूप फायदेशीर असतं.”

आलियाने यावेळी ती घरीचा एक पदार्थसुद्धा खाते ज्यामुळे त्वचा चांगली राहते असंही सांगितलं आहे. अभिनेत्री म्हणाली, “ती तुपामध्ये थोडा गुळ आणि वाटलेले शेंगदाने घालते. याचसह ती यामध्ये नारळाचाही वापर करते.” हा पदार्थ ती स्कनॅक्स म्हणून खाते. असं तिने सांगितलं आहे. अभिनेत्रीने याचा तिला खूप फायदा झाला आहे आणि हे खूप उपयुक्त असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, आलिया भट्टने यावेळी कान्स २०२६साठी विविध लूक्स केले. अभिनेत्रीचे सर्व लूकमधील फोटो सोशल मीडियवर व्हायरल होत असून तिच्या लूकबद्दल तिच्या चाहत्यांमध्येही वेगवेगळ्या चर्चाही सुरू आहेत. अभिनेत्रीने एका मुलाखतीत यंदा ती गेल्यावर्षीच्या तुलनेत अधीक शांत आणि संयमी असून तिला नवीन लोकांबरोबर संपर्क साधायला आवडतं असं म्हटलं आहे. कामाशिवाय ती घराबाहेर जात नाही त्यामुळे जेव्हा नवीन लोक भेटतात तेव्हा ती त्यांच्याशी संवाद साधत असते असंही तिने म्हटलं आहे.