Alia Bhatt on her equation with husband Ranbir Kapoor: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. रणबीर लवकरच ‘रामायण’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण, या सगळ्यात आलियाच्या एका वक्तव्यामुळे हे जोडपे चर्चेत आले आहे.

रणबीरबद्दल आलियाने केलेल्या ‘त्या’ वक्तव्याची चर्चा

आलिया व रणबीर अनेकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतात. आलियाने काजोल व ट्विंकल खन्नाच्या ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल ‘ या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने रणबीर व तिच्या नात्याबद्दल वक्तव्य केले होते. ती म्हणालेली, “रणबीर व माझ्यात खूप चांगली मैत्री आहे, त्यामुळे आमचं नातं कधीच स्वप्नाळू नव्हतं, आम्ही कायमच चांगले मित्र आहोत.”

ती असेही म्हणालेली, “मी त्याच्याबरोबर लग्न करण्याचं कारण म्हणजे तो माणूस म्हणून उत्तम आहे आणि माझ्यासाठीही चांगला आहे. पण, मला कोणत्या व्यक्तीला ट्रोल करायला आवडत असेल तर तो १०० टक्के रणबीर आहे. त्याला कोणाला ट्रोल करायला किंवा टिंगल करायचे असेल तर ती मी आहे, त्यामुळे मला वाटते की आमच्या नात्यात ती सहजता आहे.”

आलिया भट्ट (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)

आलिया असेही म्हणालेली की, मुलगी राहाच्या जन्मानंतर त्यांचे नाते थोडेसे बदलले. ती म्हणालेली, “आम्हाला मुलगी झाल्यानंतर आमचं नातं बदललं आहे. आता सगळंच पूर्णपणे वेगळं आहे. आता आम्ही एक कुटुंब म्हणून एकत्र आहोत; एक टीम म्हणून कदाचित पूर्वीपेक्षा आता आमचं नातं अधिक घट्ट झालं आहे.”

आलिया भट्ट (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)

आलिया भट्ट वेळोवेळी तिच्या भावना व्यक्त करते. विविध मुलाखतींमधून तसेच काही वेळा सोशल मीडियावरील पोस्टमधून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. काही दिवसांपूर्वीच ती ‘अल्फा’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. मात्र, या सिनेमाला अपेक्षित यश मिळाले नाही.

आलिया भट्ट (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)

दरम्यान, आलिया लवकरच ‘लव्ह अँड वॉर’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या सिनेमात विकी कौशल, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत.