Alpha Box Office Collection Day 3: सध्या अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हिंदी, मराठी भाषेतील सिनेमांचा समावेश आहे. अल्फा हा सिनेमा ३ जुलै २०२६ ला प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमाला नकारात्मक रिव्ह्यू आणि टीकेचा सामना करावा लागला. तर, काहींनी कौतुकही केले. सिनेमाला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. आता या सिनेमाने तीन दिवसांत किती कमाई केली आहे, हे जाणून घेऊ…

अल्फा या सिनेमात अभिनेत्री आलिया भट्ट, शर्वरी जोग प्रमुख भूमिकेत आहेत. तर लोकप्रिय अभिनेता हृतिक रोशनदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसला आहे.

‘अल्फा’ सिनेमाची एकूण कमाई किती?

सॅल्कनिकनुसार, सिनेमाने पहिल्या दिवशी ९. २५ कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी या सिनेमाने ११.५० कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी या सिनेमाने १३. २५ कोटींची कमाई केली. आकडेवारीनुसार, रविवारी सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. यांसह सिनेमाने तीन दिवसांत एकूण ३४ कोटींची कमाई केली आहे.

या कमाईसह सिनेमाने या वर्षी प्रदर्शित झालेल्या काही सिनेमांना पहिल्या आठवड्यात केलेल्या कमाईबाबत मागे टाकले आहे. वरूण धवनच्या है जवानी तो इश्क होना है या सिनेमाने २८.५१ कोटींची कमाई केली होती. इक्कीस या सिनेमाने २२.०५ कोटींची कमाई केली होती. प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या आठवड्यात मोठी कमाई करणारा हा सातवा चित्रपट ठरला आहे.

धुरंधर २ ने चार दिवसांत ४६६ कोटींची कमाई केली होती. बॉर्डर २ ने १२९. ८९ कोटींची कमाई केली होती. वेलकम टू द जंगल सिनेमाने ६५.८३ कोटींची कमाई केली. भूत बंगला या सिनेमाने ६५.६५ कोटींची कमाई केली. कॉकटेल २ सिनेमाने ५०.१ कोटींची कमाई केली. ओ’रोमियो सिनेमाने ३४.५१ कोटींची कमाई केली. हा सिनेमा सहाव्या स्थानावर आहे. अल्फा सिनेमाने ३४ कोटींची कमाई केली आहे, आलियाचा सिनेमा सर्वाधिक कमाईच्या बाबतीत सातव्या स्थानावर आहे. है जवानी तो इश्क होना है सिनेमा २८. ५१ कोटींच्या कमाईसह आठव्या स्थानावर आहे. इक्कीस सिनेमा २२.०५ कोटींच्या कमाईसह नवव्या स्थानावर आहे. तर पति पत्नी और वो दो या सिनेमाने २०. ११ कोटींची कमाई केली आहे. हा सिनेमा दहाव्या स्थानावर आहे.

या सिनेमा आलिया व शर्वरी यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमात हृतिक रोशन, बॉबी देओल आणि अनिल कपूर यांनी कॅमिओ केला आहे. हा सिनेमा शिव रवैल यांनी दिग्दर्शित केला आहे. तर आदित्य चोप्रा यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. दरम्यान, आता आगामी काळात हा सिनेमा किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.