Jigra Teaser Trailer : अभिनेत्री आलिया भट्टने (alia bhatt) सिनेसृष्टीत (बॉलीवूड, हॉलीवूड व दाक्षिणात्य) काम करून आपल्या अभिनयात दम असल्याचं दाखवून दिलं. लेक राहाच्या जन्मानंतर छोटासा ब्रेक घेतल्यानंतर ती ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मधून पुन्हा बॉलीवूडमध्ये दिसली आणि ‘हार्ट ऑफ स्टोन’ या सिनेमातून तिनं गेल्या वर्षी हॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र, त्यानंतर जवळपास वर्षभर आलियाचा कुठलाही सिनेमा आला नव्हता. आता मात्र आलियाचा ‘जिगरा’ हा सिनेमा येतोय. नुकताच त्याचा टीझर ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

‘जिगरा’ मध्ये आलिया भट्ट आणि ‘आर्चिज’फेम अभिनेता वेदांग रैना मुख्य भूमिकांत आहेत. आलियानं काही दिवसांपूर्वी या सिनेमाचं पोस्टर तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केलं होतं. आता तिनं याचा टीझर ट्रेलर शेअर केला आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला आलिया तिच्या समोरच्या व्यक्तीला आपल्या आयुष्याची कथा सांगते; पण कथा खूप मोठी आहे आणि तिच्या भावाजवळ खूप कमी वेळ आहे, असं ती सांगते. टीझरमध्ये आलिया आणि तिच्या भावाचं सुंदर नातं आणि छान क्षण दाखवले आहेत. टीझर सुरू होताच ‘एक हजारो में मेरी बहना है’ गाणं सुरू होतं आणि टिझर संपेपर्यंत हे गाणं ऐकायला मिळतं.

singham again trailer
Singham Again : रामायणाशी खास कनेक्शन ते खलनायकाचा जबरदस्त अंदाज! ५ मिनिटांचा ट्रेलर पाहिलात का?
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Ping g Pori Pinga fame actress enter in bigg boss marathi season 5 watch promo
Video: नव्या मालिकेतील नायिकांचा ‘बिग बॉस मराठी’च्या घरात दंगा, पुन्हा एकदा सूरजला सुतरफेणी ओळखताना आले नाकीनऊ, पाहा प्रोमो
Story Behind Daughter Raha kapoor name
‘या’ दाक्षिणात्य सुपरस्टारच्या घरात आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने ठरवलं होतं होणाऱ्या बाळाचं नाव
Bigg Boss Marathi Season 5 Abhijeet Kelkar reaction on arbaz patel elimination
“त्याचा पतंगाची दोरी…”, अरबाज पटेलच्या एलिमिनेशनवर मराठी अभिनेत्याची मार्मिक पोस्ट, म्हणाला…
devara part 1 trailer 2
Devara Part 1 trailer : “डर को समझना है तो ‘देवरा’ की कहानी सुनो…” ज्युनियर एनटीआरच्या बहुचर्चित सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित
parbeen dabas accident update
अभिनेता परवीन डबास अपघात : पत्नी प्रीती झांगियानीने दिली प्रकृतीची माहिती
actor Parvin Dabas in ICU after road accident
बॉलीवूड अभिनेता परवीन डबासचा भीषण अपघात, डोक्याला गंभीर दुखापत, ICU मध्ये असल्याची पत्नीने दिली माहिती

हेही वाचा…आलिया भट्ट करणार लाडक्या भावाचं रक्षण, ‘जिगरा’ची पहिली झलक आली समोर, ‘या’ तारखेला सिनेमा होणार प्रदर्शित

टीझरच्या मध्यावर आलिया भट्टचं पात्र काहीसं घाबरलेलं आणि कमजोर दिसतं आहे. मात्र, आपल्या भावाला वाचविण्यासाठी ती काहीही करू शकते, अगदी तुरुंगही उडवू शकते, असं दिसतं. आलियाच्या भावाला परदेशी भूमीवर काही कारणानं अटक झाली असून, त्याला सोडविण्यासाठी आलियाचे प्रयत्न सुरू आहेत. आई-वडिलांचं छत्र हरपल्यानं आलियाच आपल्या भावाची पालनकर्ती असल्याचं दाखवण्यात आलं आहे. आलिया भावाच्या आठवणीत व्याकुळ झाल्याचंही दिसतं. गंभीर आणि काहीशा घाबरलेल्या मुद्रेनं आलिया तिच्या भावाला सोडवण्यासाठी निघाली असून, या सिनेमाच्या टीझरमध्ये जबरदस्त अ‍ॅक्शन आणि स्टंट्स दाखवले आहेत.

आलियाची हातोड्यासह जबरदस्त अ‍ॅक्शनची मेजवानी

या टीझर ट्रेलरमध्ये आलिया भट्ट भावाला वाचवण्यासाठी एका तुरुंगावर स्वारी करते. तुरुंगात प्रवेश करण्यासाठी आगीच्या ज्वालांतून एक कार आत प्रवेश करतानाचा जबरदस्त सीन यात दाखवण्यात आला आहे. आलियाच्या हातात सिनेमाच्या पोस्टरपासून एक हातोडा दाखवण्यात आला आहे. हा हातोडा घेऊन आलिया किती जणांना मारणार आणि आपल्या भावाला कसं सोडवणार, हे पाहण्यासाठी सिनेमाची वाट पाहावी लागणार आहे. सिनेमाच्या पोस्टरमध्ये “तू मेरे प्रोटेक्शन में है”, असं म्हणत आलियानं हातात हातोडा घेतलेला प्रसंग दाखवला होता. या सिनेमाचं दिग्दर्शन वासन बाला केलंय असून आलियानं करण जोहरसह या सिनेमाची निर्मिती केली आहे. हा सिनेमा ११ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा…Video: “बाप्पा मोरया रे…”, सलमान खानने भाच्यांबरोबर केली गणरायाची आरती, व्हिडीओ व्हायरल

आलियाची अ‍ॅक्शन एके अ‍ॅक्शन

आलिया ‘जिगरा’मध्ये तुरुंगाच्या इमारतीवरून उड्या मारत जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसत असली, तरी आलियासाठी अ‍ॅक्शन काही नवीन नाही. कारण- गेल्या वर्षी हॉलीवूडमध्ये आलेल्या ‘हार्ट ऑफ स्टोन’ या सिनेमात पदार्पण करीत आलियानं धमाकेदार अ‍ॅक्शन सीन केले होते. हॉलीवूडच्या प्रशिक्षित तज्ज्ञांकडून अ‍ॅक्शनचे धडे घेतल्यावर आलिया बॉलीवूडमध्येही अ‍ॅक्शन थ्रिलर सिनेमात झळकणार आहे. केवळ ‘जिगरा’च नाही, तर आलिया भट्ट यशराज सिनेमाच्या ‘स्पायवर्स’मधील आगामी ‘अल्फा’ सिनेमात अ‍ॅक्शन करणार आहे. त्यात आलिया भट्टबरोबर शर्वरी वाघही दिसणार आहे.