रणबीर कपूरचा ‘रामायण’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि सध्या सर्वत्र चित्रपटाबद्दल चर्चा सुरू आहे. प्रेक्षकांकडूनही सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक जण चित्रपट पाहिल्यानंतर कौतुक करत आहेत. आता त्याची बायको अभिनेत्री आलिया भट्टनेही त्याच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. यावेळी तिने रणबीर व त्यांची लेक राहाचा ‘रामायण’च्या सेटवरील फोटो पोस्ट केला आहे. यावेळी रणबीर श्रीरामांच्या लूकमध्ये असल्याचं दिसतं.

रणबीरची आलियासाठी पोस्ट

आलियाने पोस्टमधून नवऱ्याच्या कामाचं आणि चित्रपटासाठी महेनत घेतलेल्या प्रत्येकाचं कौतुक केलं आहे. लेक राहाचे ‘रामायण’च्या सेटवरील रणबीरबरोबरचे फोटो शेअर करत ती म्हणाली, “तू या चित्रपटासाठी तुझं सर्वस्व पणाला लावलंस आणि तरीही तिच्यासाठी मागे खूप काही ठेवलंस. रणबीर, मला तुझा खूप अभिमान आहे. या अप्रतिम चित्रपटाचा अनुभव प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मनापासून मेहनत घेतली, त्या प्रत्येकाचाही मला अभिमान आहे.” आलिया पुढे म्हणाली, “काही गोष्टी आपल्या सगळ्यांपेक्षा खूप मोठ्या असतात आणि रामायण त्यापैकीच एक आहे.” आलियाने शेअर केलेले हे दोन फोटो ‘रामायण’च्या शूटिंगदरम्यानचे असून राहा तिच्या वडिलांना सेटवर भेटायला गेल्यादरम्यान काढल्याचं दिसतं.

आलियाच्या या पोस्टखाली अनेकानी कमेंट आणि लाईक करत त्यांच्या चित्रपटाबद्दलच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी यामधून रणबीरचं कौतुक केल्याचं दिसतं. सध्या सोशल मीडियावरही चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे आणि चित्रपट पाहिलेले प्रेक्षक, कलाकार त्यांच्या प्रतिक्रिया कळवत आहेत.

५ नोव्हेंबर रोजी नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. नमित मल्होत्रा यांची निर्मिती असलेला हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होता आता अखेर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे.