अभिनेत्री आलिया भट्टचा प्रवास बॉलीवूडमध्ये 'स्टुडंट ऑफ द इयर' पासून सुरू झाला. पुढे 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया', 'कपूर अँड सन्स' आणि 'बद्री की दुल्हनिया' या सिनेमांत तिने ग्लॅमरस भूमिका केल्या. तर 'हायवे', 'राझी' या सिनेमांतून तिने तिच्या सशक्त अभिनयाची चुणूक दाखवली. पुढे 'गंगूबाई काठीयावाडी' सिनेमाच्या माध्यमातून बॉयकॉट बॉलीवूड हा ट्रेंड सुरू असतानाही, तिने प्रेक्षकांना सिनेमागृहापर्यंत खेचून आणले. 'गंगूबाई'ने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. अभिनेत्रीही प्रेक्षकांना सिनेमागृहापर्यंत आणू शकते, हे आलियाने दाखवून दिले. मुलगी राहाच्या जन्मानंतर तिने काही काळासाठी सिनेमातून ब्रेक घेतला होता. त्यामुळे काही काळाच्या अंतराने तिचे सिनेमे येत होते. 'रॉकी और राणी की प्रेम कहाणी' नंतर एक वर्षाने आलिया पुन्हा एका नव्या बॉलीवूड सिनेमात दिसणार आहे. आता ती 'जिगरा' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आलिया भटने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या सिनेमाची पहिली झलक दाखवणारे पोस्टर शेअर केले आहे. सिनेमाच्या पोस्टरवरून असे दिसतेय की, या सिनेमात जबरदस्त अॅक्शन असणार आहे. कारण पोस्टरमध्ये आलियाच्या उजव्या हातात हातोडा असून, दुसऱ्या हातात एक हत्यार आहे. या पोस्टरमध्ये आलिया पाठमोरी उलटलेल्या गाडीवर उभी आहे. तिच्या पाठीवर बॅग आहे, आणि आजूबाजूला लागलेल्या आगीत समोर अभिनेता वेदांग रैना दिसतोय. आलियाने हे पोस्टर पोस्ट करताना लिहिलं, "तू मेरे प्रोटेक्शन में है." म्हणजेच मी तुझं रक्षण करत असून, तू सुरक्षित आहेस, असा तिच्या कॅप्शनचा आशय आहे. या पोस्टरवरून हा सिनेमा अॅक्शन थ्रिलर असणार असल्याचं दिसतंय. https://www.instagram.com/p/C_hhjTZTUcf/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA== हेही वाचा.फरहान अख्तर दिसणार सैनिकाच्या भूमिकेत, भारत-चीनदरम्यानच्या १९६२ च्या युद्धावर आधारित असणार ‘१२० बहादूर’ हे पोस्टर पोस्ट केल्यानंतर आलियाने काही तासांच्या अंतराने याच सिनेमाचं दुसरं पोस्टर तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये आलिया एकटीच दिसत असून, तिच्या चेहऱ्यावर अतिशय गंभीर भाव आहेत. यातही आलियाच्या हातात हातोडा असून, तिच्या मागे जाळीचे कुंपण आहे, आणि आजूबाजूला आग लागली आहे, असे दृश्य आहे. हे पोस्टर शेअर करताना आलियाने लिहिलं आहे की, "कहानी बहुत लंबी है, और भाई के पास वक्त बहुत कम," म्हणजे कथा खूप मोठी आहे, पण माझ्या भावाकडे वेळ खूप कमी आहे, अशा अर्थाचं हे वाक्य आहे. https://www.instagram.com/p/C_hvJ-XTD1t/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA== हेही वाचा.“एकाच इमारतीत राहूनही करीना माझ्याकडे दुर्लक्ष करायची”, ‘द बकिंगहॅम मर्डर्स’च्या दिग्दर्शकाचं वक्तव्य लाडकी बहीण करणार लाडक्या भावाचं रक्षण आलिया भटने 'जिगरा'चं जे पोस्टर शेअर केलं आहे, त्यावरून असे दिसतेय की, वेदांग रैना तिच्या भावाची भूमिका साकारणार आहे. आलियाने दुसऱ्या पोस्टरमध्ये भावाकडे वेळ कमी आहे आणि कथा मोठी आहे, असे म्हटले आहे, तर पहिल्या पोस्टरमध्ये "मी तुझं रक्षण करेल, तू माझ्या जवळ सुरक्षित आहेस," असे लिहिले आहे. या दोन्ही पोस्टरवरून असे दिसतेय की, या सिनेमात जबरदस्त अॅक्शन असणार आहे, आणि आलिया भट लाडक्या भावाचं रक्षण करणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन वासन बाला करणार असून, आलियाने करण जोहरसह या सिनेमाची निर्मिती केली आहे. हा सिनेमा ११ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.