बॉलीवूडमधील कलाकार हे अनेकदा त्यांच्या चित्रपटांमुळे मोठ्या चर्चेत असतात. अनेकदा मुलाखतींमध्ये केलेली त्यांच्या वक्तव्यांची चर्चा होताना दिसते. कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो किंवा पोस्टदेखील चर्चांचे विषय ठरताना दिसतात. त्याबरोबरच या कलाकारांचे जितके चाहते असतात, तितकेच त्यांच्या मुलांचेदेखील चाहते असल्याचे पाहायला मिळते. करीना कपूर खान व सैफ अली खान यांची तैमूर व जेह ही मुले असोत किंवा दीपिका पदुकोणची नुकतीच जन्मलेली लेक दुआ असो; चाहते त्यांची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असतात. या सगळ्यात रणबीर कपूर(Ranbir Kapoor) व आलिया भट्ट(Alia Bhatt) यांची मुलगी राहा(Raha Kapoor) वेळोवेळी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसते. तिचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आता आलिया भट्टची आई सोनी राजदान यांनी राहा त्यांना काय म्हणून हाक मारते, याबद्दल खुलासा केला आहे.

काय म्हणाल्या सोनी राजदान?

सोनी राजदान यांनी इन्स्टंट बॉलीवूडबरोबर संवाद साधला. आलियाची मुलगी राहा त्यांना काय म्हणून हाक मारते यावर बोलताना त्यांनी म्हटले, “ती मला नानी म्हणून हाक मारते. त्याबरोबरच ती नॅना असेही म्हणते. ती मला पूर्णपणे ओळखते. आम्ही खूप खूश आहोत. मी बऱ्याचदा तिला सांभाळत असते.”

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
इन्स्टंट बॉलीवूड इन्स्टाग्राम

राहा अनेकदा आई-वडिलांबरोबर दिसते. ती आलियासारखी दिसत असल्याचे अनेक जण म्हणतात. तर अनेक चाहते ती ऋषी कपूर यांच्यासारखी दिसते, असेही म्हणताना दिसतात. ६ नोव्हेंबर २०२२ ला राहाचा जन्म झाला होता. तिच्या जन्मापासूनच तिला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. अखेर २५ डिसेंबर २०२३ ला ख्रिसमसच्या निमित्ताने आलिया भट्ट व रणबीर कपूरने तिला पहिल्यांदा जगासमोर आणले होते. तिला पाहिल्यानंतर सोशल मीडियावर राहा कोणासारखी दिसते, याच्या चर्चा रंगलेल्या दिसल्या. राहाचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाल्याचे पाहायला मिळते.

हेही वाचा: ‘पुष्पा २’च्या ट्रेलर लाँचवेळी पाटण्यात जमलेल्या गर्दीवर सिद्धार्थचं वक्तव्य; म्हणाला, “जेसीबीचं काम सुरू असताना…”

u

दरम्यान, रणबीर कपूर व आलिया भट्ट यांनी मुलाखतींमधून राहाचा जन्म झाल्यापासून त्यांच्या आयुष्यात मोठा बदल झाल्याचे म्हटले आहे. रणबीर कपूरच्या कामाविषयी बोलायचे तर तो लवकरच ‘रामायण’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर आलिया भट्ट व रणबीर कपूर दोघेही लव्ह अँड वॉर चित्रपटात दिसणार आहेत.

Story img Loader