Allu Arjun special Post For Ramayana team: रणबीर कपूर, यश, साई पल्लवी, रवी दुबे, आदिनाथ कोठारे या लोकप्रिय कलाकारांची प्रमुख भूमिका असलेला ‘रामायण’ हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला असला तरी ॲडव्हान्स बुकिंगमधून ‘रामायण’ चित्रपटाने कोट्यवधींची कमाई केली आहे. लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुनने ‘रामायण’ सिनेमाच्या टीमसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
अल्लू अर्जुन काय म्हणाला?
अल्लू अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहिले, “रामायण’च्या संपूर्ण टीमला माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. हा फक्त एक चित्रपट नाही, तर आपल्या संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणारा आणि भारतीय सिनेमांचा दर्जा आणखी उंचावण्याचा एक प्रयत्न आहे.”
पुढे त्याने लिहिले, “या दैवी प्रयत्नासाठी मी संपूर्ण टीमला मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या कथा, आपली संस्कृती जगासमोर मांडणाऱ्या या प्रामाणिक प्रयत्नाला पाठिंबा देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवं. जय श्री राम.”

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ सिनेमाची गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. तसेच, काही दिवसांपूर्वी ॲडव्हान्स बुकिंगलाही सुरुवात झाली होती. सर्वांच्याच या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
‘रामायण’ या सिनेमाचे बजेट २००० कोटी असल्याचे म्हटले जात आहे, त्यामुळे आता हा सिनेमा किती कमाई करणार, इतर सिनेमांचे रेकॉर्ड मोडू शकणार का, पहिल्या दिवशी किती कमाई करणार, अशा अनेक गोष्टींबद्दल उत्सुकता आहे.
दरम्यान, सिनेमाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार हे बॉक्स ऑफिसवरील आकड्यांवरून स्पष्ट होणार आहे. सिनेमाची निर्मिती नमित मल्होत्रा यांनी केली आहे.
