Mini Mathur On Salman Khan Comment Kabir Khan Alliance Show: बॉलीवूडचा भाईजान सलमान खानने ‘अलायन्स’ या शोमध्ये दिग्दर्शक कबीर खानवर मजेशीर वक्तव्य केले होते. ‘अलायन्स’मध्ये सोहेल खान स्पर्धक म्हणून सहभागी झाल्यानंतर त्याला भेटण्यासाठी सलमान शोमध्ये सहभागी झाला होता. त्यामध्ये कबीरची बायको मिनी माथुर सहभागी झाली होती. हा शो तिने जिंकला असून, त्यानंतर आता सलमानने कबीर खानवर केलेले वक्तव्य तिला आवडले नसल्याचे कबूल केले आहे.

‘अलायन्स’मध्ये सलमान खान आल्यानंतर या शोची प्रचंड चर्चा रंगली होती. सलमानने मिनीची भेट घेतल्यानंतर तिचा पती कबीर खानचा उल्लेख करीत तो खूप घाबरत असल्याचे मजेशीर वक्तव्य केले होते. त्याचे व्हिडीओसुद्धा व्हायरल झाले होते. मात्र, आता नयनदीप रक्षितला दिलेल्या मुलाखतीमध्ये मिनी माथुरने ती सलमान खानची खूप चाहती असली तरी त्याने केलेले हे वक्तव्य न आवडल्याचे सांगितले. तसेच आतापर्यंत कबीर खानची पत्नी म्हणून ओळख होती, मात्र शोमुळे स्वतःची ओळख मिळाल्याने समाधान व्यक्त केले.

सलमान खान खूप आवडतो पण…- मिनी माथुर

मिनी माथुर म्हणाली, “अर्थातच, मला सलमान खान खूप आवडतो आणि त्यानं शोमध्ये माझं कौतुक केल्यानं छान वाटलं; पण त्यानं केलेली ती कमेंट मला आवडली नव्हती. मी नेहमीच कबीरची एक चांगली जोडीदार (बेटर-हाफ) म्हणून राहिले आहे; पण त्याला माझं हे वेगळं रूप पाहायला मिळालं, जे त्यानं आधी कधीच पाहिलं नव्हतं, याचा आनंद आहे.”

मिनी माथुर
मिनी माथुर
मिनी माथुर झालेली अलायन्सची विजेती

सलमान खान आल्यानंतर कसे होते ‘अलायन्स’मधील वातावरण?

सलमान खान आल्यानंतर घरातील सर्व जण खूप आश्चर्यचकित झाल्याचे तिने सांगितले. मिनी माथुर म्हणाली, “त्यावेळी घरामध्ये खूप मज्जा आली होती. घरातील बाकीचे स्पर्धक तोंड उघडून आश्चर्यानं त्याच्याकडे पाहत होते आणि ते बघायला मला मजा आली. घरातील सदस्यांना ‘हे खरंच घडतंय का?‘ कुणीतरी चिमटा काढा. सलमान खान खरंच आपल्याबरोबर कॉफी घेतोय का? असं सर्वांना वाटत होते. फायनलच्या दोन-तीन दिवस आधी घरात अशाच प्रकारच्या ऊर्जेची गरज होती. सलमाननं त्याचे अनेक वैयक्तिक अनुभव आमच्याबरोबर शेअर केले. प्रोत्साहन दिलं आणि मस्करी केली.”