Alpha And Welcome To The Jungle box office collection: सिनेमे प्रदर्शित झाल्यानंतर ते किती कमाई करतात, यावरून ते किती यशस्वी झाले याचे मूल्यमापन केले जाते. काही चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजतात. अशा सिनेमांना प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते, तर काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकत नाहीत. सिनेमाची गोष्ट, सिनेमॅटोग्राफी, कलाकारांचा अभिनय, चित्रपटातील गाणी अशा अनेक बाबींवर सिनेमाचे यश ठरलेले असते.

सध्या अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले आहेत. नुकतेच ‘मैं वापस आऊँगा’, ‘कॉकटेल २’, ‘वेलकम टू द जंगल’, ‘अल्फा’ हे सिनेमे थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आहेत. या सिनेमांना प्रेक्षकांचा कमी-जास्त प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या सगळ्यात आलिया भट्टची प्रमुख भूमिका असलेला ‘अल्फा’ हा सिनेमा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

आलिया भट्टच्या सिनेमाने किती केली कमाई?

‘अल्फा’ सिनेमा ३ जुलै २०२६ ला प्रदर्शित झाला होता. या सिनेमात आलियाबरोबरच शर्वरी जोगदेखील प्रमुख भूमिकेत आहे. याबरोबरच अनिल कपूर, हृतिक रोशन आणि बॉबी देओल यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. पहिल्या आठवड्यात या सिनेमाने भारतात ३४ कोटींची कमाई केली आहे, तर जगभरात ५७.६० कोटींची कमाई केली आहे.

आता चौथ्या दिवशी या सिनेमाने किती कमाई केली, प्रेक्षकांचा सिनेमाला कसा प्रतिसाद मिळाला, याबद्दल जाणून घेऊ…

सॅल्कनिकनुसार, ‘अल्फा’ने चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी भारतात ३.८५ कोटींची कमाई केली. यासह चित्रपटाची एकूण कमाई ३७.८५ कोटी इतकी झाली आहे; तर जगभरात या सिनेमाने ६३.६४ कोटींची कमाई केली आहे. आता आगामी काळात हा सिनेमा किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सिनेमात आलियाने सीता ही भूमिका साकारली आहे, तर बॉबी देओलने तिच्या वडिलांची फतेह सिंह यांची भूमिका साकारली आहे. अभिनेत्री शर्वरी जोगने दुर्गा ही भूमिका साकारली आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या होत्या.

अक्षय कुमारच्या ‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमाने ११ दिवसांत भारतात ११७.५५ कोटींची कमाई केली आहे; तर जगभरात १७०.३५ कोटींची कमाई केली आहे. या सिनेमात अनेक लोकप्रिय कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. इम्तियाज अली यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मैं वापस आऊँगा’ या सिनेमाने चार आठवड्यांत ५३.५० कोटींची कमाई केली आहे.