बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलचा ९ जून रोजी वाढदिवस होता. अमीषाने तिच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन केलं आहे. नाइट क्लबमधील तिच्या सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये अमीषा मित्रांबरोबर डान्स व धमाल करताना दिसत आहे. चाहते तिच्या या व्हिडीओवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
हेही वाचा – निसा देवगणचा कथित बॉयफ्रेंड वेदांत महाजन नक्की आहे तरी कोण? पार्टीतील ‘त्या’ फोटोंमुळे आहे चर्चेत




अमीषाने २००० साली ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. यामध्ये अमीषाबरोबर हृतिक रोशन मुख्य भूमिकेत होता. अमीषा तिच्या वाढदिवसानिमित्त मित्रांसोबत नाईट क्लबमध्ये डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओत तिने ‘कहो ना प्यार है’च्या टायटल ट्रॅकवर ठेका धरला. तिच्याबरोबर तिचे मित्र-मैत्रिणीही डान्स करताना दिसत आहेत.
हेही वाचा – आकाश व श्लोका अंबानीच्या लेकीचं नाव ठरलं; पृथ्वीने केली लाडक्या बहिणीच्या नावाची घोषणा
अमीषा तिच्या काही मित्रांसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी नाईट क्लबमध्ये गेली होती. तिथेही काही गाण्यांवर डान्स करून खूप धमाल केली. अमीषा काळ्या रंगाचा आउटफिटमध्ये खूप सुंदर दिसत होती. तिच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी कमेंट्स करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
दरम्यान, मागच्या बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर असलेली अमीषा लवकरच ‘गदर २’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होणार आहे. अमीषाच्या वाढदिवसानिमित्त ‘गदर: एक प्रेम कथा’ देखील २२ वर्षांनी थिएटर्समध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.