Ameesha Patel Hardik Pandya Dating Rumors Video: बॉलीवूडच्या काही अभिनेत्रींनी लग्न न करता सिंगल आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला आहे. पण, अनेकदा त्यांचे विविध अभिनेत्यांबरोबर किंवा सेलिब्रिटींबरोबर नाव जोडले जाते. सध्या यामुळेच अभिनेत्री अमीषा पटेल चर्चेत आली आहे. ४९ वर्षीय अमीषा ही भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्याला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर आता तिने स्वतः प्रतिक्रिया दिली आहे.
सोशल मीडियावर अमीषा पटेलचा पंचतारांकित हॉटेलमधील पार्टीतील व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये ती हार्दिक पंड्याबरोबर डान्स करताना दिसून आली. त्यांच्या या व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. मित्रांबरोबर हार्दिक व अमीषा पार्टीचा आनंद घेताना पाहून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. एका नेटकऱ्याने हार्दिक व अमीषामधील ही जवळीक मैत्रीपेक्षा जास्त असल्याचे म्हणताच अमीषा पटेलने यावर प्रतिक्रिया देत पलटवार केला आहे.
अमीषा व हार्दिकच्या डेटिंगचे नेटकऱ्यांची लावले अंदाज
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये अमीषा हार्दिकच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्याबरोबर हसताना दिसून येत आहे. यावेळी ती हार्दिकची तिच्या मित्र-मैत्रिणींशी ओळख करून देतानाही दिसते. पार्टीतील हा व्हिडीओ एक्स (ट्विटर) युजरने शेअर करत लिहिलं, “बंगळुरूमधील एका हॉटेलमध्ये झालेल्या पार्टीदरम्यान अमीषाने हार्दिक पंड्याच्या खांद्यावर ज्या पद्धतीने हात ठेवला… रेडिटवर सुरू असलेल्या सगळ्या अफवा खऱ्या ठरत असल्याचं दिसतंय.”
अमीषा पटेलने दिली प्रतिक्रिया
सोशल मीडियावरील या पोस्टवर अमीषा पटेलने सडेतोड उत्तर दिले आहे. इन्स्टाग्रामवर या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर करत तिने सडेतोड उत्तर दिले. तसेच हार्दिकबरोबर तिचे नाव जोडल्याने संताप व्यक्त केला. तिने लिहिले, “हो, हे खरं आहे. देवा, तू अगदी बरोबर आहेस… माझा हात त्याच्यावर ठेवण्याची ही खरंच खूप रोमँटिक पद्धत होती. मी तुला ओळखत नाही, पण तुझ्या आयुष्यत एकही मुलगी अगदी मैत्रीण म्हणूनही नसेल असं मला नक्की वाटतंय, त्यामुळे अशा पोस्ट करण्याआधी तुझ्या आयुष्यात एखादी तरी मुलगी आली पाहिजे.”

लग्नाबद्दल काय म्हणालेली अमीषा पटेल?
काही दिवसांपूर्वी अमीषा पटेलने तिला अजूनही लग्न करण्याची इच्छा असल्याचे वक्तव्य केले होते. ती म्हणालेली, “२० व्या वर्षी कशाला? मी तर अजूनही लग्नाची स्वप्ने बघते. मी खूप रोमॅंटिक आहे. याआधी माझे फार रिलेशनशिप झाले नाहीत. एखाद-दोनच झाले आहेत. मी माझ्या कामातच इतकी व्यग्र असते की, मला माझं स्वातंत्र्य आवडतं. रिलेशनशिप्समध्ये अनेकदा तुम्हाला वेळ द्यावा लागतो.”
दरम्यान, हार्दिक पंड्या सध्या मॉडेल माहिका शर्माबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. हार्दिकने वाढदिवसाच्या दिवशी इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत त्यांचे नाते जाहीर केले होते. अनेकदा ते बाहेर एकत्र फिरताना दिसून येतात.
