बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढाने ‘गलवान’चा उल्लेख करत ट्वीट केलं. रिचाच्या या ट्विटनंतर अनेक कलाकार मंडळींनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. रिचाने भारतीय लष्कराचा अपमान केल्याचा दावा करत अनेकांनी संताप व्यक्त केला. हा वाद अजूनही सुरूच आहे. अक्षय कुमारने रिचा चड्ढाच्या या ट्वीटवर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर अक्षयलाच याबाबत ट्रोल करण्यात आलं. आता क्रिकेटर अमित मिश्राने अक्षयला पाठिंबा दर्शवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“हे पाहून खूप दुःख झालं. कोणत्याही कृतीने आपण भारतीय लष्कराप्रती कृतघ्न बनू नये. कारण आज ते आहेत म्हणून आपण आहोत.” असं ट्वीट अक्षयने केलं. त्यानंतर कॅनेडियन नागरिक म्हणून त्याला ट्रोल करण्यात आलं. यावरच अमित याने एक ट्वीट केलं आहे.

अमित ट्वीट करत म्हणाला, “आपल्या प्राथमिकतेला काय झालं आहे? गलवानमधील सैनिकांबाबत भाष्य केल्याप्रकरणी अभिनेत्रीला माफी मागायला लावण्या ऐवजी लोक अक्षय कुमारला ट्रोल करत आहेत. तसेच भारतीय सैन्याच्या बाजूने उभे असलेल्या लोकांबाबत बोलत आहेत.”

आणखी वाचा – रिचा चड्ढाच्या ‘Galwan says hi!’ ट्वीटवर अक्षय कुमारही संतापला, म्हणाला “आज ते आहेत म्हणून…”

त्याने आणखी एक ट्वीट करत म्हटलं की, “शहीद सैनिकांचा आदर करा हे कोणाला सांगणंच मला योग्य वाटत नाही. ज्यांच्यामुळे रात्री आपण शांत झोपू शकतो त्यांचा आदर करा.” अक्षयला ट्रोल करण्याऐवजी रिचाला सगळ्यांनी सुनावलं पाहिजे होतं असं अमितचं मत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amit mishra support akshay kumar was tweet on richa chadha controversy see details kmd
First published on: 27-11-2022 at 14:40 IST