अमित साध आणि सुशांत सिंह राजपूत हे दोघेही प्रसिद्ध टेलिव्हिजन कलाकार होते. त्याच दरम्यान, त्यांना अभिषेक कपूरच्या ‘काई पो चे’ चित्रपटात ब्रेक मिळाला होता. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांनी एकमेकांसोबत दीड वर्षाहून अधिक काळ घालवला होता. अमितने अलीकडेच सुशांतची आठवण सांगितली. आपण त्या दीड वर्षांच्या काळात प्रियकरांसारखे होतो, अशातच २०२० मध्ये जेव्हा सुशांतच्या निधनाची बातमी कळली, तेव्हा आपल्याला धक्का बसला होता, असंही अमितने सांगितलं.

चेतन भगतशी त्याच्या पॉडकास्टमध्ये बोलताना अमितने अनेक जुन्या गोष्टींची आठवण करून दिली. “सुशांतच्या निधनाचा माझ्यावर इतका परिणाम झाला होता की मला इंडस्ट्री सोडायची होती,” असं अमितने सांगितलं. त्यावेळी त्याचा शो ब्रीद प्रदर्शित होणार होता, पण आपल्याला प्रमोशनही करू वाटत नव्हतं आणि मी ही इंडस्ट्री सोडायला तयार होतो, असंही अमित म्हणाला.

The Kerala Story triggering political drama in Kerala In Loksabha Polls 2024
‘द केरला स्टोरी’चा राजकीय आखाड्यात प्रवेश; केरळमधील वातावरण तापले; वाचा नक्की काय आहे प्रकरण!
Shekhar Suman says Kangana Ranaut Adhyayan were happy together
“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू

सुशांतने १४ जून २०२० रोजी आत्महत्या केली होती. आपल्याला हे पाऊल उचलणाऱ्या व्यक्तीची मानसिकता माहीत आहे. “मी १६ ते १८ वयोगटात चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे मला मानसिकता माहीत आहे. जरी मी आता खूप मजबूत असलो, तरी तेही अनुभवलं आहे. आता परिस्थिती बरीच बदलली आहे आणि आयुष्यही चांगलं आहे,” असं अमित म्हणाला.

“सुशांतची हत्या झाली होती, पण अधिकाऱ्यांनी…”; कूपर रुग्णालयात शवविच्छेदन करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या दाव्याने खळबळ

अमित म्हणाला की, जेव्हा एखादी व्यक्ती आत्महत्या करते, तेव्हा त्याच्या आजूबाजूच्या समाजालाच दोषी धरलं जायला हवं. “मला माहीत आहे की माणूस आत्महत्या केव्हा करतो. जेव्हा त्याची चूक नसताना त्याचं आयुष्य अंधकारात जातं, तेव्हा तो करतो आणि हे जेव्हा होतं, तेव्हा ती त्याची चूक नसते, तर ती समाजाची चूक असते, त्याच्या सभोवताली असलेल्या लोकांची चूक असते. कारण त्यातल्या कुणालाच त्या व्यक्तीच्या मानसिक स्थितीची पडलेली नसते. हे माझ्यासोबतही घडलंय,” असं अमित म्हणाला. आपल्या कठीण काळात स्मृती इराणी यांनीच संपर्क साधल्याचं अमितने सांगितलं. त्यांनी मला अचानक फोन केला आणि आम्ही सहा तास बोलत होतो, त्या माझ्या बहिणीसारख्या आहेत, असं अमित म्हणाला.

इंडस्ट्री का सोडू वाटत होती, असं विचारलं असता अमित म्हणाला, “मला कंटाळा आला होता, मी संतापलो होतो, कारण याठिकाणी टिकणं कठीण आहे. सुशांबरोबर वेळ घालवणं ही सुंदर आणि खूप मोठी गोष्ट होती. त्या आठवणी कधीच जुन्या होणार नाहीत, मी, सुशांत आणि राजकुमार राव आम्ही फक्त बेस्ट फ्रेंड्स नव्हतो, तर त्या दीड वर्षात आम्ही प्रेमी होतो, अगदी राजही. माझं राजवर खूप प्रेम आहे. जर कोणी राजकुमार किंवा सुशांतबद्दल वाईट बोललं तर मला खूप राग येतो,” असं अमित म्हणाला.

Sushant Singh: ‘त्याच्या अंगावर मारल्याचे निशाण होते’; शवविच्छेदन करणाऱ्या कर्मचाऱ्याचा खुलासा

“सुशांतच्या निधनाच्या काही महिन्यांपूर्वी मला त्याला भेटायचं होतं आणि मी त्यासाठी प्रयत्न करत होते. मी त्याच्या ओळखीतल्या एका व्यक्तीशी बोललो आणि त्याचा नंबर मागितला होता. मला त्याच्याशी बोलायचं होतं, मी त्याच्याबद्दल अनेक गोष्टी ऐकत होतो. पण मला नंबरच मिळाला नाही. सुशांतने स्वतःला कोंडून घेतल्याचं त्या व्यक्तीने मला सांगितलं होतं. तसेच तो फोन उचलत नाहीये, असंही सांगितलं. त्याने नंबर बदलला होता, पण मला वाटलं की मध्यंतरी आमचं बोलणं झालं नाही, त्यामुळे तो रागवेल. मग विचार केला की जास्त काय होईल, तो चिडेल किंवा शिव्या देईल, पण मी त्याला भेटायलाच हवं. पण जेव्हा त्या व्यक्तीने नाही म्हटलं मग मी नंबर मिळवण्याचं सोडून दिलं. मग मीही माझ्या कामात व्यग्र झालो,” असं अमितने सांगितलं.